यशोगाथा : निखिल साठे (१८ सप्टेंबर २०२५)

0

यशोगाथा : निखिल साठे (१८ सप्टेंबर २०२५)

परिचय पत्र

नाव: निखिल साठे
वय: ३३ वर्षे
उंची: १६८ सेंमी
व्यवसाय: C. A.
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९१५८९५२८९०

माझी परिवर्तन कथा

२०२४ च्या एप्रिल महिन्यात माझ्या वजनाच्या काट्याने मला चांगलाच धक्का दिला. कारण त्याने माझ् वजन चक्क ११० कि. झालेले दाखवले. याचे कारणही तसेच होते. माझी बैठी जीवनशैली. ही माझ्यासाठी धोक्याची घंटा होती. घराच डायबेटिसची हिस्ट्रीही होतीच. त्यात वाढलेले वजन. त्यामुळे मधुमेहाची टेस्ट करणे अनिवार्य होते. मी १३ एप्रिल २०२४ ला माझी रक्त्ताची तपासणी केली तर एचबीएवनसी ७.३% आले.
मला त्याआधी डॉ दीक्षित जीवनशैलीबद्दल माहिती होती. मी काही काळ आचरणात आणली होती. पण ही माहिती शास्त्रशुद्ध नव्हती. मी लगेचच सेंटरला आलो. माझे रिपोर्ट पाहून सेंटरमध्ये जीवनशैली तंतोतंत पाळली तर मिळणारे फायदे याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर दिली. माझे वयाच्या मानाने वजन आणि एचबीएवनसी याचे प्रमाण भितीदायक होते. मी ही जीवनपद्धती तंतोतंत पाळण्याचा निर्धार केला. त्याप्रमाणे निग्रहाने जीवनशैली आचरण्यास सुरुवात केली. चांगली बाब म्हणजे डॉ दीक्षित सरांनी मला मधुमेहावर कोणतेही औषध सुरु केले नाही.

मी जीवनशैली १००% आचरण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितलेल्या क्रमाने खाणे व उचित व्यायाम याची जोड दिली. एक महिन्यातच माझे वजन ३ किलोने व एचबीएवनसी ०.६ ने कमी झाले. माझा उत्साह वाढला. मी माझ्या सर्व खाण्याच्या सवयीत सुधारणा केली. चार महिन्यातच माझे वजन १७ किलोने व एचबीएवनसी ५.६ पर्यंत उतरले. माझा उत्साह वाढला. माझी चालण्याची क्षमता व वेग वाढला. आता मी चालण्याबरोबर ३० मि. पळू पण लागलो. सुरुवातीला पळणे मला अशक्यप्राय वाटत होते.
वजन उतरण्याचा दुसरा फायदा म्हणजे ६-७ महिन्यापूर्वीचे कपडे मी परत घालू लागलो. मला माहित आहे की माझ्या लक्ष्याचा अर्धा टप्पाच मी गाठला आहे. पण मला विश्वास आहे मी उर्वरित टप्पा पण गाठू शकेन. मला सेंटरमध्ये अविनाश गोखले सर, डॉ. स्वाती सामंत मॅडम व सेंटरचे सर्व ॲडमिन व शेवटी डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांचे उत्तम मार्गदर्शन व साह्य मिळाले. त्यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. माझे उर्वरित लक्ष्य मी लवकरच पूर्ण करणार आहे. यासाठी मी सेंटरच्या सर्वांचा सतत मिळणाऱ्या सहकार्याबद्दल कायम ऋणी असेन. माझ्या आयुष्यात आलेल्या ह्या व्यक्त्ती देवदूत आहेत असे मला वाटते.

 

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts