यशोगाथा : तारीख 14 July 2025

0

यशोगाथा : तारीख 14 July 2025

परिचय पत्र

नाव: चंद्रकांत यादव
वय: ७२ वर्षे
उंची: १६२ सेंमी
वास्तव्य: औंध, पुणे
व्यवसाय: निवृत्त
समूह: DRC PUNE
मोबाईल: ९४०४०५८२४१

माझी परिवर्तन कथा

मी चंद्रकांत यादव ७२ वर्षांचा आहे. वयोमानाप्रमाणे पाय फार दुखत होते. चालायला त्रास होत होता. डॉक्टरांकडे गेलो असता त्यांनी गुडघ्याचे ऑपरेशन करायला सांगितले. काही टेस्टही करायला सांगितल्या. त्या वेळी मला डायबेटीस झाल्याचे कळाले. त्यावेळी माझे एचबीएवनसी ६.८% होते.
मी बऱ्याच वेळी डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांचे व्याख्यान यू ट्यूबवर ऐकले होते. पण गणेश क्रीडामंदीरात प्रत्यक्ष व्याख्यान ऐकायचा योग आला. मी माझ्या मनाने ती जीवनशैली आत्मसात करायचा प्रयत्न केला. पण ते नीट व नियमित होत नव्हते. कधी करायचो कधी सोडून द्यायचो.
मला पेपरमधून पुण्यात D R C सुरु झाल्याचे कळाले. त्यावेळी मला गोळ्या चालू होत्या. मी जेव्हा सेंटरला आलो व माझे रिपोर्ट दाखवले. तेव्हा सेंटरच्या डॉक्टरांनी माझ्या गोळ्या पूर्णपणे थांबविल्या. मला प्रामाणिकपणे डाएट करायचा सल्ला दिला. मी पण आपल्याला मधुमेह मुक्त्त व्हायचे आहे हे मनोमन जाणून ही जीवनशैली प्रामाणिकपणे व धरसोड वृत्ती न करता पाळण्याचा निश्चय केला. सेंटरमध्ये मला जीवनशैलीबद्दल सर्व माहिती देण्यात आली व माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले. मी पहिल्यांदा जेव्हा सेंटरला आलो तेव्हा माझे वजन ७६ किलो व एचबीएवनसी ६.८% होते.
मी न चुकता मला सांगितलेल्या तारखेला सेंटरला येत होतो. आज डिसेंबर २०२३ ला माझे वजन ६७ किलो व एचबीएवनसी ५.८ आहे. जेवतांना जो क्रम सांगितला त्याप्रमाणे मी जेवतो. सध्या मी रोज ८-१० कि.मी. चालतो. दोन जेवणामध्ये फक्त्त पाणी पितो. मी D R C मध्ये आल्यापासून गोड खाल्लेले नाही. माझ्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते.
सध्या मला कोणताही आजार नाही. पचन व्यवस्थित होते. झोप शांत लागते. मी या जीवनशैलीवर खूष आहे. सध्या मी पूर्व-मधुमेही आहे. पण मला खात्री आहे की मी लवकरच मधुमेह मुक्त्त होईल. मी डॉ दीक्षित सरांचा व सेंटरमधील सर्वांचा आभारी आहे. मी माझ्या सहवासात येणाऱ्या व्यक्त्तींना ही जीवनशैली करण्याबद्दल प्रवृत्त करतो.

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts