यशोगाथा : डॉ नितिन सूर्यवंशी
परिचय पत्र
नाव: डॉ नितिन सूर्यवंशी
वय: ४२ वर्षे
उंची: १७५ सेंमी
*व्यवसाय: डॉक्टर
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९८६७५११०१५
माझी परिवर्तन कथा
मी व्यवसायाने डॉक्टर (physician) असून १० वर्षांपासून ॲलोपथीची प्रॅक्टिस करत आहे. जसे सर्व डॉक्टरांचे तसे मी वैद्यकीय सेवा सुरु केल्यापासून कामाचा व्याप वाढत गेला त्यामुळे जेवणाकडे व तब्येतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. वजनाचा काटा पार शंभरच्या पुढे गेला होता. बी.पी. पण खूप वाढले होते. २०१७ मध्ये खर तर डॉ. दीक्षित सरांबद्दल ऐकले होते व व्हिडिओमध्ये ऐकल्याप्रमाणे प्रयत्न पण केला. पण आळसाने सर्वांवर मात केली. आळस व दुर्लक्ष यामुळे फायदा झाला नाही.
नंतर करोनाचे आगमन झाले व अजून प्रॉब्लेम वाढले. पण माणसाच्या आयुष्यात एकवेळ येते ज्यावेळेस धोक्याची घंटी वाजते. तेव्हा आपण स्वतःहून परिस्थितीवर मात करण्याचा मनाशी निश्चय करतो. शेवटी फेब्रुवारी २०२२ मध्ये तो दिवस उजाडला. व मी ९० डेज चॅलेंजमध्ये भाग घेतला. माझ्या बायकोने पूर्ण पाठिंबा दिल्यामुळे मी हे चॅलेंज पूर्ण करु शकलो. माझे एचबीएवनसी ८.५ वरुन ७.३% वर आले.
मला मार्च २०२३ मध्ये डॉ. दीक्षितांनी सुरु केलेल्या D R C ची माहिती मिळाली व मी लगेचच सेंटरला हजर झालो. त्यावेळी एचबीएवनसी ८.२% असून वजन ९९ कि. झाले होते. मी D R C ला आल्यावर औषधे पूर्ण बंद केली होती. ती मी पूर्वी २ वर्षे घेत होतो. मी सहा महिन्यात मधुमेही मधून पूर्व मधुमेही झालो. अजूनही पूर्व मधुमेही या गटातच आहे. मला डॉक्टर म्हणून औषधे देणे सोपे होते. परंतु जीवनपद्धती बदलणे म्हणजे नक्की काय हे डॉ. दीक्षित व गोखले सरांमुळे कळाले.
मी सध्या खूप उल्हासित व आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहे. मी माझ्या बऱ्याचशा रुग्णांना ही जीवनपद्धतीचा अवलंब करण्याबाबत प्रोत्साहित करतो. हे व्रत मी पुढील आयुष्यभर पाळणार आहे.
“जेव्हा इच्छाशक्ती असते तेव्हा एक मार्ग असतो आणि चांगल्या आयुष्याचा मार्ग तो डॉ. दीक्षित सर यांनी दिला आणि दाखवला आहे. देव त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य देवो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा.”

