यशोगाथा : ज्ञानेश्वर भोसले

0

यशोगाथा : ज्ञानेश्वर भोसले

परिचय पत्र

नाव: ज्ञानेश्वर भोसले
वय: ३२ वर्षे
उंची: १६५ सेंमी
वास्तव्य: नांदेड सिटी, पुणे
व्यवसाय: नोकरी
समूह: DRC Pune मोबाईल: ९४०४०१२४४४

माझी परिवर्तन कथा

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात माझ्या पोटात खूप दुखत होते म्हणून मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतांना माझ्या रक्त्त तपासण्या झाल्या. त्यात मला डायबेटिस झाल्याचे कळले. माझे एचबीएवनसी ११.२% आले. माझे वय लहान ३२ वर्षे असल्यामुळे मला खूप धक्का बसला. हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मला डायबेटिसची औषधे सुरु केली.
माझे सासर गोवर्धन मुळक हे डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांचे ओळखीचे होते. ते त्यांची जीवनशैली अनुसरत होते. त्यांनी मला डॉ. दीक्षित सरांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे मी पुण्याच्या जगंली महाराज रोडवरच्या DRC सेंटरला येऊन डॉ. दीक्षित सरांना भेटलो. माझी औषधे दाखवली. त्यांनी ती औषधे बदलून जरा कमी पॉवरची औषधे फक्त्त १ महिना घ्यायला सांगितली. जीवनपद्धती नीट समजून घेऊन काटेकोरपणे पाळायला सांगितली.
विश्वास जोशी सरांनी मला जीवनशैली व्यवस्थितपणे समजावून सांगितली. मी तसे करण्याचा निश्चय केला. परंतु मला सुरुवातीला ते शक्य होत नव्हते. खूप त्रास झाला. कारण मी रोज सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा व समोसा किंवा वडापाव खात होतो. आता फक्त्त दोनदा जेवणे कठीण वाटत होते. पण सरांनी घरात बनवलेले ताक चाले म्हणून सांगितल्यामुळे मी फक्त्त दोन जेवायला सुरुवात केली.
दोन महिन्यानी माझे एचबीएवनसी कमी झाले व वजनपण एक किलोने कमी झाले. ८ मार्च २०२४ ला एचबीएवनसी ७.८% आले. माझा उत्साह वाढला. माझी औषधे सरांनी बंद केली. प्रथम मला काम करतांना आळस येत असे. पण आता आळसाच्या जागी उत्साह आला. माझ्या पत्नीने मला माझ्या जेवणाच्या वेळा पाळण्यात आणि डाएट प्रमाणे जेवण तयार करुन देण्यात खूपच मदत केली. तिच्या प्रोत्साहनामुळेच मी ही जीवनशैली पाळू शकलो.
या जीवनपद्धतीमुळे माझ्या पोटाच्या तक्रारी कमी झाल्या. पचन व्यवस्थित झाले. रोजच्या चालण्यात मी खंड पडू देत नाही. आळस कमी झाल्यामुळे मी लवकर झोपतो व लवकर उठतो. पूर्वी मी खूप उशिरा झोपत असे. हे सर्व डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांच्या जीवनशैलीमुळेच साध्य होऊ शकले. मी ही जीवनशैली आयुष्यभर पाळून मधुमेहमुक्त्त राहण्याचा प्रयत्न करणार आहे. मी सरांचा व त्यांच्या पूर्ण टीमचा अत्यंत आभारी आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts