यशोगाथा : चंद्रशेखर बोकील
परिचय पत्र
नाव: चंद्रशेखर बोकील
वय: ६७ वर्षे
उंची: १७० सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९९३००५५३९९
माझी परिवर्तन कथा
मी डॉ. दीक्षित यांच्या जीवनशैलीबद्दल २०१८ पासून ज्ञात होतो पण त्याबद्दल कधी जास्त माहिती करुन घेतली नव्हती. मी लार्सन ॲड टुब्रो या कंपनीत सेल्स व मार्केटिंगचा जनरल मॅनेजर होतो. त्यामुळे वारंवार ऑफिसच्या टूरला जावे लागे. जेवणाच्या वेळा वेळेवर नव्हत्या व फारच अनियमितता होती. घरात मधुमेहाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. आई, वडील, भावंडे कोणालाही मधुमेह नव्हता. त्यामुळे मी मधुमेहाचा कधी विचारच केला नाही. त्याबाबत निश्चिंत होतो. रोज २, ३ वेळेस जेवतखात होतो.
जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात आजारी पडलो. ॲन्टिबायोटिक घेऊनही माझा ताप उतरत नव्हता. माझ्या फॅमिली डॉक्टरांनी CBC आणि युरिन टेस्ट करायला सांगितल्या. टेस्ट केली असतांना माझ्या युरिनमध्ये साखरेचे निदान झाले व मला धक्का बसला. नंतर ब्लड टेस्ट केल्यानंतर आणखी धक्का बसला. ज्याचा मी कधी विचारच केला नव्हता तेच पुढे येऊन उभे ठाकले. माझे एचबीएवनसी १०.७% आले आणि मला मधुमेही रुग्णाचा शिक्का बसला. मला लगेचच औषधे सुरु झाली.
फेब्रुवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात माझ्या पत्नीलाही डायबेटिसचे पहिल्यांदा निदान झाले. तिने मला डॉ दीक्षित सरांच्या DRC सेंटरला जाण्याचा सल्ला दिला व त्यांची जीवनपद्धती अवलंबण्याबद्दल सांगितले. मी संशयवादी असल्यामुळे सेंटरला जाण्यास उत्सुक नव्हतो. खरच या जीवनपद्धतीमुळे डायबेटिस रिव्हर्स होतो काॽ या बद्दल मी साशंक होतो.
तरीही मी माझ्या पत्नीवरील विश्वासामुळे मनात नसतांना सेंटरला गेलो. पण तिथे गेल्यानंतर तिथल्या सर्व व्हॉलिंटियरचे आपुलकीचे स्वागत, आश्वासक बोलणे आणि उत्तम मार्गदर्शन यामुळे मी खूप सकारात्मक विचाराला पोचलो. ही जीवनशैली पाळण्याचा निश्चय करुनच घरी आलो. मी ही जीवनशैली तंतोतंत पाळत आहे. रोज ८-९ कि. मी. चालतो आणि रोज दोनदाच जेवतो.
तीन महिन्यात माझे एचबीएवनसीचा रिपोर्ट पाहून मी आश्चर्यचकित झालो. माझे एचबीएवनसी १०.७ वरुन ६.९% पर्यंत खाली आले. माझी औषधेही मार्चमध्येच पूर्णपणे बंद झाली. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे औषधे बंद झाल्यावरही माझे एचबीएवनसी उतरतेच होते.
मी डॉ. दीक्षित सर व त्यांची सर्व टीम सर्वांना मधुमेहमुक्त्त करण्याकरिता निःशुल्क सेवा तीही आपलेपणाने व आश्वासक शब्दात देतात याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. मी ही जीवनपद्धती उर्वरित आयुष्यात कसोशीने पाळणार व त्याचे लाभ इतरांना नित्य सांगणार आहे.

