यशोगाथा : चंद्रकांत खामकर (१८ऑगस्ट २०२५)

0

यशोगाथा : चंद्रकांत खामकर (१८ऑगस्ट २०२५)

परिचय पत्र

नाव: चंद्रकांत खामकर
वय: ७६ वर्षे
उंची: १५७ सेंमी
व्यवसाय: सेवानिवृत्त
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९४२०२८६४३०

माझी परिवर्तन कथा

माझे नाव चंद्रकांत खामकर असून माझे वय ७६ वर्ष आहे. मला गेल्या ५/६ वर्षांपासून मधुमेह आहे. तेव्हा माझे एचबीएवनसी ६.५ ते ६.८% मध्ये रहात असे. तेव्हा मला मधुमेहाची औषधे सुद्धा चालू होती. मी metformin – 500 च्या गोळ्या दिवसातून ३ वेळा घेत असे. माझ्या एका मित्राने मला डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांबद्दल व त्यांच्या जीवनपद्धतीबद्दल सांगितले. मी यूट्यूबवरचे त्यांचे व्हिडिओ पाहिले. डॉक्टरांनी डायबेटिसबद्दल व तो का होतो याबद्दल दिलेली माहिती मला फार पटली व मी ही जीवनपद्धती आचरण्याचा निर्णय घेतला. मी ही जीवनशैली डिसेंबर २०२३ पासून सुरु केली होती. त्यावेळी माझे एचबीएवनसी ६.४% होते आणि वजन ६४ किलो होते.

मी फेब्रुवारी २०२४ च्या सहा तारखेला D R C पुणे येथे गेलो. गेल्यावर मला जीवनपद्धतीची संपूर्ण माहिती मिळाली. मी जीवनपद्धतीचे आचरण आधीच सुरु केल्यामुळे मला काही त्रास झाला नाही. दर महिन्याला एचबीएवनसी चेक करुन सेंटरमध्ये येण्यास सांगितले. त्याप्रमाणे जीवनपद्धती तंतोतंत पाळून मी येत होतो. एप्रिल २०२४ च्या भेटीमध्ये डॉ. स्वाती सामंत यांनी माझा औषधांचा डोस खूप कमी केला कारण त्यावेळी माझे एचबीएवनसी ५.७% आले होते. औषधांचा डोस कमी केल्यावर मे महिन्यात एचबीएवनसी वाढेल असे वाटले होते. परंतु प्रत्यक्षात ते ५.६% आले. तेव्हा डॉक्टरांनी माझी औषधे पूर्णपणे बंद केली. आता वजनही ६० कि. झाले होते. आता मी पूर्ण आनंदी व समाधानी आहे. मी डॉ. जगन्नाथ दीक्षित सर व सेंटरच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर्व मधुमेही पेशंटना आवाहन करतो की तुम्ही ही जीवनशैली पाळा व डायबेटिसमुक्त्त व्हा. मी मनाशी निग्रह केला आहे की मी ही जीवनशैली आयुष्यभर पाळीन व मधुमेह मुक्त्त जीवन जगेन.

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts