यशोगाथा : गोरक्ष अहेर (१६ऑगस्ट २०२५)
परिचय पत्र
नाव: गोरक्ष अहेर
वय: ४५ वर्षे
उंची: १७८ सेंमी
व्यवसाय: IT profesional
वास्तव्य: पिंपरी, चिंचवड, पुणे
समूह: DRC PUNE
मोबाईल: ९०११०६८७५६
माझी परिवर्तन कथा
जानेवारी २०२४ मध्ये मला वारंवार लघवीला जाणे व घशाला कोरड पडणे याचा त्रास होत होता. डॉक्टरांनी मला माझी रक्त्तातील शुगर तपासायला सांगितली. रक्त्ताचा रिपोर्ट आल्यावर मला जबरदस्त धक्का बसला. माझे एचबीएवनसी १०.४% आले.
मी लगेचच माझ्या फॅमिली डॉक्टरना सल्ला विचारला. माझी शुगर नॉर्मलला आणण्याकरिता त्यांनी लगेच औषधे सुरु करण्याचा सल्ला दिला व त्याप्रमाणे सुरु केली. परंतु त्यावेळी मी डॉ. दीक्षित जीवनपद्धती बद्दल अवगत होतो. एक महिना मी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जीवनपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्धार करुन पहिल्या दिवसापासून मी ती जीवनपद्धती प्रमाणे २ वेळा जेवण्यास सुरुवात केली.
१३ फेब्रुवारी २०२४ ला मी पुणे येथे असलेल्या D R C सेंटरला गेलो. प्रत्यक्ष डॉ. दीक्षित सरांची भेट झाली. त्यावेळी माझे एचबीएवनसी ८.४% आले होते. सरांनी सर्व औषधांबद्दल माहिती सांगितले व जीवनपद्धती सुरु केली याबद्दल पण सांगितले. सरांनी माझी औषधे त्याचदिवशी निम्याने कमी केली. मला खूप छान वाटले.


DRC मध्ये परत मला जीवनशैली छोट्या गोष्टींसकट समजावून सांगितली व एक महिन्याने बोलावले. त्यानुसार २३.०३.२०२४ ला एचबीएवनसी टेस्ट करुन सेंटरला गेलो. माझे एचबीएवनसी ६.४% आले. आजही मला परत डॉ. दीक्षित स्वतः भेटले. माझी प्रगती पाहून ते खूप खूश झाले व त्यांनी माझी सर्व औषधे बंद केली.
मला मधुमेह झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मी डॉ दीक्षित जीवनशैली अगदी काटेकोरपणे पाळत आहे. मी माझ्या आहारात साखरेचा कोणताही डायरेक्ट व इंडायरेक्ट समावेश होणार नाही याची पूरेपूर काळजी घेतो. मी अजिबात फळे खात नाही. मी ४५ मिनिटे मसलट्रेनिंग व ४५ मिनिटे चालणे याचा व्यायामात समावेश केला आहे.
२३ मे २०२४ रोजी माझे एचबीएवनसी ५.३% आले व मी मधुमेह-मुक्त्त झालो. या ५ महिन्यात माझा थकवा दूर झाला व माझी ॲसिडिटी पण गेली. माझ्या झोपेच्या क्वालिटीमध्ये खूप सुधारणा झाली. मी ही जीवनपद्धती आयुष्यभर पाळण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या नातेवाईक व मित्रपरिवारात याचा प्रसार करणार आहे.
मी डॉ. दीक्षित सरांचा ऋणी आहे. त्यांचे व त्यांच्या टीमचे कोणतेही आर्थिक लाभ न घेता चालणारे हे काम ते ज्या पद्धतीने करतात त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. माझ्या पत्नीनेही वेळोवेळी आवश्यक डाएट प्लॅन सांभाळले त्याबद्दल तिलाही मनापासून धन्यवाद.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)