यशोगाथा : कुमुद देशपांडे

0

यशोगाथा : कुमुद देशपांडे

परिचय पत्र

नाव- कुमुद देशपांडे
वय- ६७ वर्षे
उंची- १४९.८६ सेमी
व्यवसाय – निवृत्त वैद्यकीय अधिकारी
वास्तव्य- नांदेड
समूह- छ.संभाजी नगर
मोबाईल- ९०९६८२०४६६

माझी परिवर्तन कथा

गेल्या ३३ वर्षापासून मला बीपी चा त्रास आणि २३ वर्षापासून गुडघेदुखी आहे. वजन कमी केल्याने यातून सुटका मिळेल म्हणून मी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. अगदी आठवडाभर फक्त भाज्या खा, फळं खा असं केलं. दरवेळी वजन थोडं कमी व्हायचं आणि पुन्हा जैसे थे. पण २०१८ मध्ये पेपरला डॉक्टर दीक्षित सरांच्या व्याख्यानाची बातमी ऐकून त्याप्रमाणे आहार घ्यायला सुरुवात केली. परंतु दोन जेवणात सगळं खायचं म्हणून गोड, फळं अति प्रमाणात खाल्लं आणि मग मी पूर्व मधुमेही गटामध्ये आले. त्यानंतर एक दोन नव्हे तर सात आव्हानांमध्ये भाग घेतला. अखेरीस सातव्या आव्हानामध्ये माझं वजन कमी व्हायला सुरुवात झाली. मी सणवार असूनही पूर्ण शिस्त पाळली. व्यायाम एकदाही चुकवला नाही. प्रोग्रॅम मध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या. महत्त्वाचं म्हणजे समोर काही दिसलं की तोंडात टाकण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवलं.
९० दिवसानंतर चे अंतिम निकाल याप्रमाणे आहेत.
एचबीएवनसी सुरुवातीला ६.५ होते ते ६% झाले.
सुरुवातीचे वजन ६५ किलो होते,ते ६१ किलो पर्यंत उतरले.
उपाशी पोटी चे इन्सुलिन १२.२ होते ते ११.२ झाले.
पोटाचा घेर १०० सेमी वरुन ९८ सेमी पर्यंत कमी झाला.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉक्टर दीक्षित आणि बोलबत्तीन सरांची मनापासून आभारी आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts