यशोगाथा : अर्चना रायर (तारीख 6th Aug 2025)

0

यशोगाथा : अर्चना रायर (तारीख 6th Aug 2025)

परिचय पत्र

नाव: अर्चना रायर
वय: ५२ वर्षे
उंची: १६३ सेंमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९४०५०३३२८१

माझी परिवर्तन कथा

माझे मिस्टर डिफेन्समध्ये नौकरीला आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत पुण्याबाहेरच बदलीवर होतो. मला गेले १० वर्षे डायबेटिस आहे. त्यावरील गोळ्या पण चालू होत्या. डिसेंबर २०२३ ला माझ्या मिस्टरांची बदली पुण्याला झाली व आम्ही कॅंपमध्ये रहायला आलो. आमचे शेजारी श्री. कुलकर्णी यांच्याकडून डॉ. दीक्षित जीवनशैलीबद्दल कळाले. डायबेटिसच्या गोळ्या खातांना त्यांचा साईडइफेक्ट आपल्या आरोग्यावर परिणाम करेल याची सारखी भीती वाटत होतीच.
ही जीवनशैली समजून घेण्याचा मी मनोमन निश्चय केला. वयाच्या पन्नाशीत आरोग्याबाबतचा फोकस बदलावा असे वाटू लागले. आत्तापर्यंतच्या अनियमित जीवनशैलीमुळे माझ्या मधुमेह व वजन यावरील नियंत्रण सुटलेले होते. ११ डिसेंबर २०२३ ला टेस्ट केल्यानंतर माझे एचबीएवनसी ८.५% आणि उपाशीपोटी इन्सुलीन २४.७ होते. मी सेंटरमध्ये येऊन सर्व जीवनपद्धती व्यवस्थितपणे समजावून घेतली व लगेचच अनुसरण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला फक्त्त दोनदाच जेवण्याचा त्रास वाटत होता. परंतु कुटुंबाने चांगली सकारात्मक साथ दिली. मी या जीवनशैलीचे तंतोतंत पालन केले. माझे एचबीएवनसी तीन महिन्यातच ८.५ वरुन ६.५% पर्यंत खाली उतरले. माझे वजनही २ कि. कमी झाले. सेंटरच्या डॉक्टरांनी माझी औषधे बऱ्यापैकी कमी केली. आता मला औषधे पूर्ण बंद होण्याबद्दल विश्वास वाटू लागला.
मी डॉ. दीक्षित सर व त्यांच्या टीमचे खूप खूप आभार मानते. ही जीवनशैली एवढी प्रभावी असून विनामूल्य समजावून दिली जाते.
मी ही जीवनशैली आयुष्यभर पाळण्याचा निश्चय केला आहे. मी माझ्या कुटुंबाची पण आभारी आहे. त्यांच्या प्रोत्साहनाशिवाय हे सर्व कठीण होते.

(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts