यशोगाथा : अरुणा जगताप (१६ ऑक्टोबर)
परिचय पत्र
*नाव : अरुणा जगताप *
वय: ६१ वर्षे
उंची: १५२ सेंमी
*व्यवसाय: सेवानिवृत्त पर्यवेक्षिका *
*वास्तव्य: होनाजीनगर, जिल्हा- छ. संभाजीनगर *
*समूह: छ. संभाजीनगर *
मोबाईल: ९९७५४०१६५०
माझी परिवर्तन कथा
२०२२ साली मला मधुमेह झाल्याचे समजले. तेव्हा माझे एचबीए१सी ९.१% होते. वजन ८५ किलो होते. थायरॉइडचा ही त्रास होता. माझ्या मैत्रिणीकडून डॉ दीक्षित जीवनशैली ची माहिती समजली. तसेच यूट्यूब वर डॉ दीक्षित सरांचे व्याख्याने ऐकून मी ५ व्या व ६ व्या डॉ दीक्षित मधुमेह रिवर्सल आणि वेट लॉस चॅलेंज मध्ये भाग घेतला होता. तेव्हा मला खूप चांगला फरक जाणवला. एचबीए१सी ७.१% पर्यंत कमी झाले. वजन ७६ किलो पर्यंत कमी झाले. माहे जून २०२५ पासून डॉ दीक्षित वेटलॉस चॅलेंज चे ७ वे पर्व सूरू झाले त्यात मी पुन्हा भाग घेतला. माझे एचबीए१सी ७.१% होते ते पहिल्या महिन्यातच ६.८% पर्यंत खाली आले. मला गुड़घेदुखी चा त्रास आहे. त्यामुळे जास्त चालणे जमत नाही. तीन महिन्यानंतर एचबीए१सी ७.०% झाले. एचबीए१सी मध्ये जास्त फरक झाला नाही. सणांमुळे माझ्या खाण्यात चुकी झाली असेल. वजन जून मध्ये ७६ किलो होते, आता ७३ किलो झाले आहे व पोटाचा घेर ९५ सेमी वरून ९३ सेमी झाले आहे.


गटप्रमुख श्रीनिवास सर काटेकोर पणे जेवणाच्या ताटाचे निरीक्षण करायचे व काय कमी आहे याबद्दल मार्गदर्शन करायचे व सकाळीच त्यांचा मेसेज यायचा ‘चला निघा चालायला’. तसेच मेघना भिडे मॅडम ही दररोज डाएटचे रेसीपी पाठवायच्या. जेवणाची सुरूवात कशी करावी याचेही मार्गदर्शन केले. दर आठवड्याला एक्टिव्हिटी घेण्यात आल. डॉ दीक्षित सरांचे व्हीडिओ मार्फत मार्गदर्शन करण्यात आले. जेव्हापासून मी जीवनशैली सुरू केले, तेव्हां पासून माझे वजन, पोटाचा घेर, एचबीए१सी, फास्टिंग इन्शुलिन कमी झाले व फायदा झाला. डॉ दीक्षित जीवनशैली मुळे माझ्या औषधांचा डोस कमी झाला, वजन वाढत नाही आणि हलके हलके वाटते. दिवसातून दोनच वेळा जेवणाची सवय लागली. आता पित्ताचा त्रास होत नाही त्यामुळे मी ही डॉ दीक्षित जीवनशैली चालू ठेवणार आहे व इतरांनाही या जीवनशैली बद्दल माहिती सांगणार आहे.
दीक्षित सर, श्रीनिवास सर, निखिल नाफड़े सर, मेघना भिड़े मॅडम याचे आभार मानते व सर्व टीमचे धन्यवाद.
(मराठी पुनर्लेखन : श्रीनिवास बोलाबत्तीन)
