यशोगाथा : सोनल चिंचाळकर

0

यशोगाथा : सोनल चिंचाळकर

परिचय पत्र

नाव: सोनल चिंचाळकर
वय: ४९ वर्षे
उंची: १७५ सेंमी
व्यवसाय: इमिटेशन ज्वेलरी
वास्तव्य: पुणे
मोबाईल: ९४२२०२८८९८

माझी परिवर्तन कथा

मी सोनल मिलिंद चिंचाळकर. मी १ मार्च २०२५ ला रूटीन चेक-अप केलं तेव्हा माझे एचबीएवनसी ८ %आले. मला आमच्या डॉक्टरने डायबिटीस साठी औषध घेण्यास सांगितले. मी ते चार दिवस घेतले पण माझे मिस्टर डॉ दीक्षित जीवनशैलीचे पूर्वी अनुसरण करत होते, त्यांनी डॉ अतुल कुलकर्णी सरांशी संपर्क केला. त्यांनी फोन वरून मला सांगितले की तुम्ही औषध घेऊ नका, डॉ दीक्षित जीवनशैलीचे अनुसरण करा.
मी ते केले आणि माझ्या आयुष्यात खूप बदल झाला. मी रोज ४ कि. मी. चालणे सुरू केले, वजन वाढल्यामुळे चालायचा कंटाळा करायचे पण डॉ दीक्षित जीवनशैली अनुसरून चालणे सुरू केल्याबरोबर मला खूप तजेलदार वाटायला लागले. खूप खुश आहे मी! अतुल कुलकर्णी सर आणि डॉ दीक्षित सर यांना मन:पूर्वक धन्यवाद!

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts