यशोगाथा : अनीता चौधरी

0

यशोगाथा : अनीता चौधरी

परिचय पत्र

नाम: अनीता चौधरी
आयु: ५२ वर्ष
ऊंचाई: १५७ सेमी
व्यवसाय: गृहिणी
निवास: पुणे
समूह: DRC पुणे
मोबाइल: ७५८८०३६६६८

माझी परिवर्तन कथा

मागील २-३ वर्षांपासून माझे एचबीएवनसी ७% होते. मला तेव्हापासूनच डॉ. दीक्षित जीवनशैलीची थोडीशी माहिती होती. परंतु मला दिवसभर सारखे खायची सवय होती. त्यामुळे मला नक्की माहित होते की मी ही जीवनशैली प्रमाणे फक्त्त दोनदाच जेवू शकणार नाही. माझे वजनही दिवसेंदिवस वाढत होते.
सरांची बदली पुण्याला आमच्याच कॉलेजमध्ये रुजू झाल्याचे कळले. मी कॉलेजमध्येच एकदा सरांना जाऊन भेटले. त्यावेळेस सरांनी मला पुणे येथील सेंटरची माहिती दिली. एचबीएवनसी आणि उपाशीपोटी इन्सुलिन टेस्ट करुन सेंटरला यायला सांगितले. मी व माझे मिस्टर दोघांनी दोन्ही टेस्ट केल्या व सेंटरला गेलो. त्यावेळेस माझे एचबीएवनसी ७.३%, वजन ६७.८ किलो आणि उपाशीपोटी इन्सुलिन १९.२ होते.
शेवटी ऑक्टोबर २०२३ पासून मी जीवनशैली पाळण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणे सुरुवात केली. सुरुवातीला थोडा थोडा त्रास होत होता. नंतर दसरा दिवाळी आले. त्यामुळे परत नीट पाळता आले नाही. सेंटरला आल्यावर अविनाश सर, शिल्पा मॅडम व स्वाती मॅडम यांनी परत छान मार्गदर्शन केले.
मी ९० दिवसांच्या 5th challange मध्ये भाग घेतला. त्यात मी श्रीकांत सर व सिंग सर यांच्या गृपमध्ये होते. गृपमध्ये मला परत मार्गदर्शन मिळाले. रोजच्या ॲक्टिव्हीटीमुळे उत्साह वाढला व जीवनशैली पाळण्यात एक नियमितता व सातत्य आले. रोज मी ४.५ ते ५ कि. मी. चालत होते. आता माझे वजनपण उतरायला लागले. ऊर्जेत फरक पडला. पाणी पिण्याचे प्रमाण वाढले त्यामुळे माझा पित्ताचा त्रास पण कमी झाला. कोणतेही डायबेटिसचे औषध न घेता तीन महिन्यात माझे एचबीएवनसी ६.९% झाले. मी मधुमेही पासून पूर्व-मधुमेही झाले. मला आता खूप समाधान वाटते व मी लवकरच मधुमेह-मुक्त होईन याचा विश्वास वाटतो.
मी डॉ. जगन्नाथ दीक्षित सर, सेंटरची सर्व टीम व ९० day challenge मधील माझे ॲडमिन सर्वांचे मी मनापासून आभार मानते. मी ही जीवनशैली आयुष्यभर पाळण्याचा मनोमन निश्चय केला आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts