यशोगाथा : अनिरुद्ध गोवेकर (२४ सप्टेंबर २०२५)
परिचय पत्र
नाव: अनिरुद्ध गोवेकर
वय: २३ वर्षे
उंची: १६४ सें.मी.
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: नोकरी
समूह: DRC Pune
मोबाइल ९४०४९५३०२९
माझी परिवर्तन कथा
मला सप्टेंबर २०२३ मध्ये गंभीर कोविड संसर्ग झाला होता. मी ५ दिवस व्हेंटिलेटरवर होतो. माझ्यावर पुष्कळ स्टिरॉइड्सचे उपचार करण्यात आले व साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन्सची इंजेक्शन्स देली गेली. या आधी मला साखर नव्हती ती मला ६ महिने गोड खाऊ नये म्हणून सांगितले कारण त्यामुळे मला मधुमेह होऊ शकतो. मी एक वर्ष अगदी काटेकोरपणे पाळले व नंतर मात्र मिठाई खाऊ लागलो.
नोव्हेंबर २०२३ मध्ये माझी साखर एकदम ३०० पर्यंत वाढली व मला मधुमेह असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी मला इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्यास सांगितले व ते आयुष्यभर घ्यावे लागेल असेही सांगितले. त्याचवेळी मला डॉ दीक्षित जीवनशैलीबद्दल माहिती नव्हती. मी इंजेक्शन घ्यायला सुरुवात केली.
डिसेंबर २०२३ मध्ये माझ्या पत्नीने मला डॉ. दीक्षित सरांचा यूट्यूबवरील व्हिडिओ दाखविला. त्याचवेळी त्यांचे इतरही व्हिडिओ मी ऐकले व DRC पुणे ला भेट देण्याचे ठरवले. मी एचबीएवनसी अहवालासह केंद्राला भेट दिली. माझे एचबीएवनसी ९.२% होते. मला सेंटरला जीवनशैलीबद्दल सर्व शंकेसह अवगत केले. मी ती जीवनशैली तंतोतंत पाळायला सुरुवात केली.


मी स्वतःहूनच १५ जानेवारी २०२४ पासून इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे बंद केले. दर महिन्याला एचबीएवनसी करुन मी सेंटरला जात होतो. दोन महिन्यातच माझे एचबीएवनसी ५.४% आले. मी मधुमेह-मुक्त झालो. मी हे सर्व औषधे न घेता साध्य केले. याचा मला खूप आनंद झाला. हे सर्व मला डॉ. दीक्षित सर व त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झाली. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. ही सर्वोपयोगी जीवनशैली प्रत्येकाने अंगिकारावी असे वाटते.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)