यशोगाथा : अनिता ठाकूर
कृपया लक्षात ठेवा की अनिता तिचे फोटो शेअर करू इच्छित नाही, चला तिच्या गोपनीयतेचा आदर करूया!
परिचय पत्र
नाव: अनिता ठाकूर
वय: ५३ वर्षे
उंची: १५७ सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: कात्रज, पुणे
समूह: DRC Pune
मोबाईल: ९१७५७५९७३६
माझी परिवर्तन कथा
मला गेल्या ८ वर्षांपासून मधुमेह आहे व मी मधुमेहाची औषधे तेव्हापासून घेत होते. ज्या वेळी मला मधुमेह झाला तेव्हाच मला डॉक्टरांनी रोजच्या रोज गोळ्या घेण्याबद्दल सांगितले.
माझे कौटुंबिक मित्र अमरेंद्र सिंह यांनी त्यांच्या पत्नीद्वारे मला निरोप दिला की, “वहिनींना विचार की तुमची शुगरची गोळी बंद करायची आहे काॽ” परंतु माझा त्यावर विश्वास बसला नाही. त्यावर त्यांनी मला समजावले खूप वर्षे गोळी खाल्ली तर त्याचा परिणाम आयुष्यावर होतो. जसे झाडे तोडायला लागले तर पडू शकतात. तसेच आयुष्याचे आहे. त्यांनी त्यांची गोळी बंद झाल्याचे सांगितले. मला खूप आश्चर्य वाटले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेच मला टेस्ट करायला घेऊन गेले. त्यांच्याच मदतीने व सल्ल्याने मी ११ फेब्रुवारी २०२४ला
D R C पुणे येथे आले. त्यावेळी माझी एचबीएवनसी ८.८% व उपाशीपोटी इन्सुलीन १३ होते. तिथे शिल्पा मॅडम व जोशी सरांनी आमचे कौन्सलिंग केले व त्याच दिवशी माझ्या गोळ्यांची पॉवर डॉ. स्वाती मॅडमने कमी केली.
मी लगेच जीवनशैलीत सांगितल्याप्रमाणे आचरणाला सुरुवात केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे १४ मार्च २०२४ ला परत एचबीएवनसी केले असता ते ७.२ आले. मी D R C आल्यावर माझ्या गोळ्यांची पॉवर अजून कमी केली. एप्रिलमध्ये टेस्ट केल्यावर माझे एचबीएवनसी ६.६% आले. अमरेंद्र पतीपत्नीने माझ्या घरी येऊन माझा सत्कार केला. आता माझ्या आनंदाला पारावार नव्हता. मी खूप खूश होते व जीवनपद्धती अगदी कसोशीने पाळत होते.
१५ मे २०२४ ला रिपोर्ट करुन सेंटरला गेले तर मला स्वतः डॉ. दीक्षित सर भेटले. माझे एचबीएवनसी ६.२% आलेले पाहून माझे अभिनंदन केले.
आता मला स्वतःला खूप हलके वाटायला लागले आहे. माझी आता खात्री झाली की माणसाने एकदा मनाने निश्चय केला तर साखरेपासून मुक्त्ती जरुर मिळते.
मी डॉ. दीक्षित सर व त्यांचे सर्व D R C चे सहकारी व अमरेंद्र सिंह यांची मनापासून आभारी आहे. मी स्वतःलाही आश्वस्त करते की मी लवकरच मधुमेह-मुक्त होईन आणि कायम तसेच राहण्यासाठी ही जीवनशैली आयुष्यभर अंगिकारेन.


(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)