महत्वाची सूचना: यशोगाथा शेअर करण्याचे महत्त्व आणि तुमच्या यशोगाथा लिहिण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे (६ सप्टेंबर २०२५)

0

महत्वाची सूचना: यशोगाथा शेअर करण्याचे महत्त्व आणि तुमच्या यशोगाथा लिहिण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे (६ सप्टेंबर २०२५)

महत्वाची सूचना

 यशोगाथा शेअर करण्याचे महत्त्व आणि तुमच्या यशोगाथा लिहिण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे 

मित्रांनो!
आपली आहारयोजना विज्ञानावर आधारलेली असल्याने, जे ह्याचे पालन प्रामाणिकपणे करतात त्या प्रत्येकाला त्याचा लाभ मिळतो.
प्रत्येक व्हॉट्सॲप गटात ५० हून जास्त सदस्य आहेत, प्रयेक टेलिग्राम गटात ३००० ते ७००० तर फेसबुक पृष्ठ / गटात मिळून ६०००० पेक्षा जास्त सदस्य आहेत. तुम्हांला होत असलेला लाभ आम्हांला कसा कळणार?
माझी तुम्हांला विनंती आहे की, कृपया आपल्या यशोगाथा सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात.

यश म्हणजे काय?
१) वजन घट
२) एचबीए1सी कमी होणे.
३) उपाशीपोटी इन्सुलिन कमी होणे.
४) पूर्व – मधुमेहापासून मधुमेह-मुक्त स्थितीपर्यंतचे झालेले परिवर्तन.
५) मधुमेहावरील औषधांची मात्रा कमी होणे.
६) मधुमेहावरील औषधे बंद होणे.
७) आम्लपित्त, थायरॉईड, उच्च रक्तदाब इत्यादी
समस्यांसाठी लाभदायी.
८) उत्साहाच्या पातळीत सुधारणा व आरोग्यसंपन्न असण्याची जाणीव.

लोक आपल्या यशोगाथा सर्वांपर्यंत का पोहोचवत नाहीत?

भ्रम आणि वास्तव

भ्रम १) “ज्यांची यशोगाथा गटात प्रसिद्ध झाली आहे त्यांच्याप्रमाणे माझे यश वैशिष्ट्यपूर्ण नाही.
वास्तव – यश हे यशच असते. ५ किलो वजन घटण्याचे यश हे २० किलो घटण्यासमान आहे कारण ज्या व्यक्तीचे वजन २० किलो घटले त्याची सुरुवात १ किलो घटण्यापासूनच झाली आहे. नेहमी लक्षात असू द्या की जर दिशा योग्य असेल तर लक्ष्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचाल, आता नाही तर नंतर !!

भ्रम २) माझे २० किलो वजन कमी झाल्यावर किंवा मी मधुमेह – मुक्त झाल्यानंतर माझी यशोगाथा सर्वांपर्यंत पोहोचवेन.
वास्तव – आहारयोजनेच्या ह्या प्रवासात खरा आनंद आणि समाधान आहे. प्रत्येक छोटे यश साजरे करा. लहान-मोठे कोणत्याही स्वरूपाचे यश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतः ला रोखू नका.

भ्रम ३) “माझे विचार मी चांगल्या भाषेत व्यक्त करू शकत नाही. लोक मला हसतील.”
वास्तव – भाषेपेक्षाही आपला अनुभव सर्वांपर्यंत पोहोचवणे हे अधिक महत्त्वाचे आहे. आमच्याकडे अनुवादकांची टीम आहे. तुम्हांला मदत करण्याचा त्यांना आनंदच होईल. तुम्ही तुमची यशोगाथा ध्वनिमुद्रित करून आम्हांला ‘व्हॉइस मेसेज’ म्हणून पाठवू शकता.

आपण एक ‘कुटुंब’ आहोत आणि म्हणूनच तुमच्या भाषेला किंवा उच्चारांना कोणीही हसणार नाही ह्याची खात्री बाळगा. येथे प्रत्येक जण दुसऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे.

यशोगाथा का लिहावी?

१) स्वतःला आणि इतरांना प्रेरित करण्यासाठी
२) दुसऱ्यांना मदत करण्याची ही संधी आहे.
जर तुमची यशोगाथा प्रसिद्ध झाली तर, तुम्हांला हजारो संदेश व दूरध्वनी येतील.
तुम्ही पाठवलेल्या यशोगाथेतून दिसणाऱ्या प्रामाणिक प्रयत्नामुळे इतरांना त्यांच्या चुका सुधारण्यास मदत होईल किंवा त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर शिक्कामोर्तब होईल.
३) आम्हांला प्रेरित करण्यासाठी –
तुमच्या यशामुळे आम्हांला आनंद होतो. आम्हांला अत्यंत आवश्यक असे प्रोत्साहन मिळते आणि पुढे जाण्यासाठी उत्साह…..

मला खात्री आहे की, हे निवेदन वाचल्यावर तुम्ही तुमच्या यशोगाथा प्रवेशकांना (ज्यांनी तुम्हांला गटात सामील केले) किंवा मला व्हाट्सअप्पवर पाठवाल.

तुम्ही तुमच्या अपयशाच्या कहाण्याही पाठवू शकता!! त्यामुळे आम्हांला सुधारणा करण्यास मदत होईल.

सर्वांना शुभेच्छा
डॉ. जगन्नाथ दीक्षित

(मराठी अनुवाद – नीलिमा टिपरे)
वाशी – नवी मुंबई

आपल्या यशोगाथा लिहिणे सुटसुटीत, पद्धतशीर होण्यासाठी व वाचकांना समजण्यास सोपे व्हावे तसेच यशोगाथा अधिक परिणामकारक व्हावी यासाठी खालील काही मार्गदर्शक तत्वे दिली आहेत.
यशोगाथेत खालील गोष्टींचा समावेश असावा-

१. व्यक्तिगत माहिती- पूर्ण नाव, वय, राहण्याचे ठिकाण, नोकरी किंवा व्यवसायाचे स्वरूप, उंची, संपर्क क्रमांक किंवा ई-मेल, EWL गट क्रमांक,

२. डाएट सुरु केल्याची तारीख, डाएट बद्दल प्रथम माहिती मिळण्याचा स्रोत जसे व्याख्यान, विडिओ क्लिप, व्हाट्सअॅप मेसेज, पहिल्या रक्त परिक्षणाची तारीख, यशोगाथा लिहिण्याआधी डाएट पालन केलेला निरीक्षण कालावधी.

३. डाएट पालन करताना निरीक्षण कालावधीच्या सुरुवात व अंतीचे रक्तपरिक्षणाचे व शारीरिक मोजमापांचे परिणाम- HbA1c, उपाशीपोटी इन्सुलिन, वजन, कमरेचा किंवा बेंबीजवळ पोटाचा घेर, नितंबांचा घेर ( जे पेअर शेप स्थूलत्व कमी करू इच्छितात), इतर काही निगडित परीक्षणे.

४. सुरवातीच्या काही दिवसातील अनुभव- डाएट पालन सुरु करण्याआधीच्या शारीरिक व्याधी व त्यांची औषध योजना, डाएट सुरु करण्याआधीची दिनचर्या, रोजच्या जेवणाच्या वेळा कशा ठरवल्या, सुरवातीस आलेल्या काही अडचणी व आपण त्यावर कशी मात केली, व्यायामाचे प्रकार, कालावधी व आठवड्यातील किती वेळा व्यायाम करता.

५. डाएट प्लॅनची निरंतरता-स्वतःत पाहिलेले बदल, निरीक्षण कालावधीत डाएट पालन किंवा व्यायामात काही खंड, आपल्या जेवणातील पदार्थ आणि त्याचे प्रमाण, डाएट पालन करताना मिळालेली उल्लेखनीय मदत किंवा मार्गदर्शन जसे पालक, सहकारी, जीवनसाथी, गट प्रमुख इत्यादी.

६. निरीक्षण कालावधीनंतर जीवनात अनुभवलेले बदल, आधीच्या असलेल्या व्याधी मध्ये फरक व त्याच्या औषधयोजनेतील फरक, वजनातील घट व मधुमेहाच्या व्यतिरिक्त अनुभवलेले वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक जीवनातील इतर फायदे.

७. भविष्यातील संकल्प, मित्र, सहकारी किंवा नातेवाईकांना डाएट प्लॅन बद्दल काही जागृती केली असल्यास त्याची माहिती

सूचना- सदस्यांनी आपली यशोगाथा संबंधीत गट प्रमुखांना पाठवावी, स्वतः ग्रुप वर यशोगाथा पाठवू नये, कारण आपल्या यशोगाथेचे इतर प्रादेशिक भाषेत भाषांतर करून ती अनेक लोकांपर्यंत पोचवायचा आमचा प्रयत्न आहे

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts