महत्वाची माहिती : HbA1C आणि फास्टिंग इन्सुलिन समजून घेऊया (२८ ऑगस्ट २०२५)
महत्वाची माहिती
पल्लवीची यशोगाथा ऐकल्यावर बऱ्याच जणांच्या मनात तिचे फास्टिंग इन्सुलिन चे आकडे बघून (१ पेक्षा कमी ते १० च्या वर गेले) त्याबाबत शंका-कुशंका आणि कुतूहल जागृत झाले आहे .
फास्टिंग इन्सुलिन हे इन्सुलिनच्या कार्यात येणारा प्रतिरोध (अडथळा ) दर्शवते
त्याची नॉर्मल पातळी साधारण ३ ते २६ असते . पण तुम्ही उपाशीपोटी असल्यावर ती कमीत कमी असणे अपेक्षित आहे.
सुदृढ निरोगी माणसात ती १० पेक्षा निश्चितच कमी असावी.
HbA1C आपल्याला मागील ३ महिन्यांची सरासरी रक्त शर्करा दर्शवते . नॉर्मल पातळी
५. ६ किंवा कमी. ५.७ ते ६. ४ म्हणजे पूर्व मधुमेह स्थिती (प्रिडायबेटिस ). आणि ६. ५ पेक्षा जास्त म्हणजे मधुमेह .
फास्टिंग इन्सुलिन आणि HbA1C च्या बाबतीत ४ शक्यता संभवतात:
१. फास्टिंग इन्सुलिन खूप कमी आणि HbA1C ५.६ किंवा कमी म्हणजे सुदृढ अवस्था; मधुमेह नाही .
२. फास्टिंग इन्सुलिन १० पेक्षा जास्त आणि HbA1C नॉर्मल म्हणजे इन्सुलिन प्रतिरोधाची ( रेसिस्टन्सची ) सुरुवात .
३. फास्टिंग इन्सुलिन १० पेक्षा जास्त आणि HbA1C ५.७ किंवा जास्त म्हणजे इन्सुलिनची व्यवस्थित निर्मिती असून सुद्धा रक्त शर्करा काबूत ठेवण्याची शरीराची अकार्यक्षमता .
४. फास्टिंग इन्सुलिन कमी
(३ पेक्षा कमी) आणि HbA1C जास्त म्हणजे स्वादुपिंडावर (पॅनक्रियास ) येणारा ताण – आवश्यक तितकी इन्सुलिन निर्मिती करण्यास असमर्थ. .
आपल्या डाएट प्लॅनमुळे इन्सुलिन प्रतिरोध (रेसिस्टन्स) कमी व्हायला मदत होते. पल्लवीच्या बाबतीत – तिचे फास्टिंग इन्सुलिन खूप कमी होते . डाएट प्लॅनमुळे ते वाढले आणि त्याबरोबरच HbA1C कमी झाले आणि मधुमेह नसण्याच्या पातळीवर आले .
२-३ महिन्यांनंतर तिचे फास्टिंग इन्सुलिन कमी होऊन १० किंवा त्याच्याही खाली येईल . आणि नॉर्मल HbA1C आणि इन्सुलिनची पातळी कमी म्हणजे चांगल्या आरोग्याचे द्योतक होईल.
(सर्वांनी हे जरूर लक्षात घ्यावे कि रिकाम्या पोटी असण्याचा कालावधी जेवढा वाढेल तेवढी फास्टिंग इन्सुलिनची पातळी कमी होईल. त्यामुळे रक्ताचा नमुना सकाळी ९ वाजता देणं आणि सकाळी ७ किंवा ८ वाजता देणं यानेही फरक पडतो . ९ वाजता केलेल्या तपासणीत फास्टिंग इन्सुलिन कमी येईल. त्यामुळे रक्त तपासायला देताना वेळा पाळणे महत्वाचे.)
(मराठी अनुवाद :डॉ स्वाती उनकुले)