डॉ. दीक्षित यांचा वाढदिवस (२५ जानेवारी २०२६)

0

डॉ. दीक्षित यांचा वाढदिवस (२५ जानेवारी २०२६)

रक्तदान किंवा २१ किमी हाफ मॅरेथॉन

अभियानातील सर्व सदस्यांना माझा नमस्कार

आपणास माहीतच आहे डॉ दीक्षित सरांचा 25 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. आणि दीक्षित सर स्वतः दरवर्षी त्यांचा वाढदिवस हा रक्तदान करून साजरा करतात.

ह्यापासून प्रेरित होऊन माझी अशी कल्पना आहे की आपल्या सर्व सदस्यांनी ह्या दिवशी, ज्याला शक्य आहे त्यांनी स्वतः रक्तदान करावे किंवा 21 कि मी हाफ मॅरेथॉन करावे. जर कोणाला शक्य असेल तर ते रक्तदान शिबिरही आयोजित करू शकतात

मला वाटते आपण वरील उपक्रम करून आपल्या तर्फे सरांना वाढदिवसाची एक अनोखी अशी भेट देऊ. सर्व सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात यावे यासाठी आपण सरांना सुचवू.

आशा करतो की सर्व सदस्य ह्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी करतील

धन्यवाद

– सुनिल पवार
+91 88796 16058

(आपण रक्तदान करून किंवा २१ किमी पळून ते फोटो आपआपल्या ग्रुपवर टाकावे व मला वैयक्तिक 8879616058 ह्या नंबर वर सुद्धा पाठवावे, म्हणजे प्रमाणपत्र देणे सोयीचे होईल. हाफ मॅरेथॉन तसेच रक्तदानाचा 24 ते 27 जानेवारी २०२६ मधील डेटाच ग्राह्य धरला जाईल.)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts