आज चा प्रश्न: सकाळी नाश्ता न केल्याने आरोग्यावर काही वाईट परिणाम होईल का?

0

आज चा प्रश्न: सकाळी नाश्ता न केल्याने आरोग्यावर काही वाईट परिणाम होईल का?

उत्तर

एक लक्ष्यात घ्या, की दिवसातून एकदाच जेवण करणारे लोकदेखील आहेत. त्यांच्या प्रकृतीवर काही विपरित परिणाम झालेला दिसत नाही. दिवसातून दोनदा जेवण पुरेसे असते. जितक्या जास्त वेळा तुम्ही खाल तितक्या जास्त वेळा शरीरात इन्सुलिन ची निर्मिती होईल. हे टाळण्यासाठी दोनदाच जेवणे महत्त्वाचे आहे. खरं तर आपल्याकडे नाश्त्या वा ब्रेकफास्ट हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. संस्कृत भाषेत ब्रेकफास्टला पर्यायी शब्दच नाही यावरून ही बाब स्पष्ट होईल. तुम्ही नाश्ता न केल्यास शरीरात आधी ग्लायकोजेन व नंतर चरबी पासून शरीराच्या पेशींना उर्जा पुरवली जाते. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन कमी होते. म्हणजे, नाश्ता न केल्याने उलट शरीरावर चांगलाच परिणाम होतो. काही जणांना सकाळी नाश्ता करणे अत्यावश्यक वाटत असेल तर त्यांनी त्याच वेळेला जेवून घ्यावे. मग दुपारी जेवण न घेता सरळ रात्री जेवावे. भूक लागल्यावर जेवणे हेच नैसर्गिक आहे. ज्याला सकाळी नऊ वाजता भूक लागते, त्याने तेव्हांच जेवून घ्यावे. त्याला ‘नाष्टा’ असे नाव आपण दिले आहे. एकूण काय की दिवसातून दोनदाच जेवावे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts