आज चा प्रश्न: आम्ही अपयशाची माहिती तुम्हाला कळवू शकतो का?!

0

आज चा प्रश्न: आम्ही अपयशाची माहिती तुम्हाला कळवू शकतो का?!

उत्तर

हे ग्रुप निर्माण करण्याचा उद्देश तुमच्या सम्परकात राहणे हा आहेच पण त्याच बरोबर आमचा डाएट प्लॅन अंगिकारून तुम्हाला आलेल्या अडचणी, यश, शंका, अपयश, तुमच्या अपेक्षा हेही आम्हाला समजून घ्यायचे आहे.

लोक यश मिळण्याबाबत जास्त लिहितात व ते साहजिक आहे.
लक्षात घ्या की आमचे सर्व ग्रुप म्हणजे आमचा डाएट प्लॅन हा सामायिक बंध असलेले आपले एक कुटुंब आहे.
दोन कारणांसाठी आम्ही अपयशाविषयी जाणून घेऊ इच्छितो:
१) यामुळे त्या व्यक्तीला व इतरांनाही काय चूक होत आहे ते कळायला मदत होईल व ती दुरुस्तही करता येईल
२) यामुळे डाएट प्लॅनचा कोणाला कमी फायदा होतो याविषयी माहीती गोळा होईल. कारण या डाएट प्लॅनमुळे सर्वांचे वजन कमी होते व मधूमेह प्रतिबंध होतो हे शास्त्रीय सत्य आहे.

त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की आपले अपयश व अडचणीही आम्हाला कळवा. यातूनच नवीन बोध घेऊन हे अभियान आणखी मोठे होणार आहे

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts