आजची सूचना
डॉ. दीक्षित: आज मी कांहीं ख़ास बाबींचे विश्लेषण करू इच्छितो उदा. आहार योजनेचे काटेकोरपणें पालन करूनही वजन कमी न होणे, तसेच आहार योजनेचे पालन केल्यामुळे होणारा अस्वस्थपणा!
आज मी हेमंत, दीपाली आणि फरीदाबरोबर चर्चा केली. या तीन्ही लोकांच्यात एक गोष्ट सामान्य आढळली कीं या तीघांनी गेल्या कांहीं आठवड्यांपासून फक्त दोन वेळा भोजन केले होते तरीही त्यांचे वजन कमी झाले नव्हते. याखेरीज त्यांना गॅसेसचा त्रास, सूज येणे व सहनशक्तीच्या बाहेर भूक लागणे हे त्रासही होत होते.
या सर्वांते मूळ कारण हे सापडले कीं ते जेंव्हां रोज दोनदा भोजन करत असत त्या वेळा त्यांना भूक लागण्याशी संबंधित नव्हत्या पण नोकरीच्या सोयीनुसार मिळणाऱ्या वेळेनुसार होत्या!
आमच्या आहार योजनेचे मूळ तत्व आहे की दररोज दोन वेळा खावे व तेही कडाडून भूक लागेल त्या वेळीच खावे. जर आपण भूक लागल्यावर जेवू शकलो नाहीं तर जठरात स्रवणारे पाचकरस व आम्लरस नीट काम करू शकत नाहींत व त्याचा परिणाम अॅसिडिटी, अपचन, पोटात गॅस होणे व सूज येणे या स्वरूपाच्या तक्रारींत होते. या परिस्थितीत वजनही कमी होत नाहीं!
आणखी एक गोष्ट या तीन्ही व्यक्तींच्यामध्ये सामान्य होती ती म्हणजे या तीघांनी HbA1C व अनशेपोटीचे इन्शुलिन तपासून घेतले नव्हते. या दोन चाचण्या खूपच महत्वाच्या आहेत कारण यांच्या परिणामांतून आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या पिष्टमय पदार्थांच्या चयापचयाबाबतच्या प्रतिक्रिया समजतात व त्यामुळे पुढील उपाययोजना ठरविता येते.
कांहीं लोकांच्याबाबत प्रथम सकारात्मक बदल दिसून येतात व पाठोपाठ वजन कमी होणे व पोटाचा घेर कमी होणे हे परिणामही दिसू लागतात.
तात्पर्य:
१) जेंव्हां कडाडून भूक लागली असेल तेंव्हांच खा.
२) दररोज कमीत कमी ४५ मिनटे व्यायाम करा.
३) शक्य तितक्या लवकर आपल्या रक्ताची तपासणी करून HbA1C व अनशेपोटीची इन्शुलिन यांची मात्रा जाणून घ्या.
– डॉ जगन्नाथ दीक्षित