आजची यशोगाथा : सौ. विनिता मारुती कणदूरकर ( १८ फेब्रुवारी २०२६ )
परिचय पत्र
नाव: सौ. विनिता मारुती कणदूरकर
ईमेल : vandanakandurkar@gmail.com
वय/उंची : ५७ वर्ष/१५४ से.मी
नवासस्थान : मुंबई
व्यवसाय : नोकरी
गृप: Mumbai DYDN 7th Ch Group
मोबाईल : ७९७७४९२१४३
मला मधुमेह, वजन वाढ, सांधेदुखी इ. या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या.
मला मैत्रिणीद्वारे डॉ. दीक्षित जीवनशैली आणि 90 दिवसांचे आव्हानाला बद्दल माहिती मिळाली. हे चॅलेंज जून २०२५ पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला.
कुटुंबीय आणि मित्रांना खात्री नव्हती, विशेषतः श्रावण,गणपती उत्सव सारख्या सणांमुळे, पण मी पूर्ण मनाने हे आव्हान करण्याचे ठरवले आणि खरी जीवनशैली माझी सुरुवात झाली ११ जून २०२५ पासून.
मी पूर्ण शिस्त पाळली: दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवणाचे फोटो शेअर केले , व्यायाम/ क्रियाकलाप अपडेट केले नाही परंतु कार्यक्रम मध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या.
९० दिवसांनंतर अंतिम निकाल:
HbA1c: ६.१ % सुरुवातीचे → ५.९ % शेवटचे ,
वजन: ८६ kg किलो सुरुवातीचे → ७८.५ kg किलो शेवटचे ,
कंबर: ११६ से.मी सुरुवातीची → १०० से.मी शेवटची
इतर सुधारणा: ऊर्जा वाढली
माझ्या आयुष्यातील सवात मोठी जाणीव म्हणजे: ह्या जीवनशैली मुळे माझी रक्तातली साखर आटोक्यात येऊ शकते ह्याची जाणीव प्रकर्षाने झाली.
या संपूण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर आणि शिवानी मॅडम, पूजा मॅडम यांची मनापासून आभारी आहे.
माझ्या समोर वेगवेगळे पदार्थ खुणावत होते . उदा: चहा, सामोसा, बटाटा वडा,गोड पदार्थ, दूध, साखर इत्यादी ह्या सर्व पदार्थांचा मी त्याग केला. सुरुवातीला त्याचा त्रास तर झालाच पण मनावर ताबा मिळवण्यात मला यश आलं. ग्रुप मध्ये त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाककृतीच्या मार्गदर्शना प्रमाणे मी त्या पदार्थ चे अचूक प्रमाणात सेवन करत होते. त्याचा मला फायदा तर झालाच पण नवनवीन पदार्थ शिकायला मिळाले व त्यामुळेच कि काय माझी मानसिकता बदलली आणि ह्या जीवनशैली मुळे माझ्या चेहऱ्यावर छान चमक पण आला आणि शरीरातील उत्साह वाढला, थकवा कमी झाला. डॉ. दीक्षित जीवनशैली मुळे ९० दिवसात ७.५ किलो वजन कमी करण्यात मी यशस्वी झाले. मी ही जीवनशैली आयुष्यभर पाळण्याचा निर्धार केला आहे. ह्या जीवनशैली मुळे शरीरातील बऱयाच रोगावर मात करू शकतो हे प्रकर्षा ने जाणवले.
अनुवादक : मृगेन्दु जोशी


