आजची यशोगाथा : सुरेश येवतीकर
परिचय पत्र
आजची यशोगाथा
नाव : सुरेश येवतीकर
वय: ६० वर्षे
उंची: १६४ सेंमी
व्यवसाय: निवृत्त बँक अधिकारी
वास्तव्य: नांदेड
समूह: छ. संभाजीनगर
मोबाईल: ९८५०९७५६४३
ई मेल: sureshyeotikar2309@gmail.com
मी प्रथम ५ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत 3 किमी गटात गम्मत म्हणून भाग घेतला. त्या दिवशी तेथे डॉ दीक्षित सरांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. खूप स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी बऱ्याच सहभागी स्पर्धकांनी त्यांच्या यशोगाथा कथन केल्या. स्पर्धेत जरी नबंर आला नाही तरी त्यांना आलेले डॉ. दीक्षित जीवनशैलीचे अनभुव सांगितल्यामुळे माझ्या सारख्या (२००८ पासून मधुमेहाने पीडीत असलेल्या) सहभागी ला प्रेरणा मिळाली. अशी जीवनशैली आपणाला सहजरित्या अवलंबता येईल याची खात्री वाटली.
नंतर काही दिवसांनी ९० दिवसाचे ‘डॉ दीक्षित वेट लॉस व डायबेटीस रिवर्सल चॅलेंज’ सुरू होणार असल्याचे निखिल नाफडे सरांकडून कळाले व मी देखील त्यात सहभाग नोंदवला. यामध्ये दिल्याप्रमाणे आहार, पदार्थ खाण्याचा क्रम, दोन वेळा जेवण करणे व त्या सोबत व्यायाम अर्थात ४.५० किमी ४५ मिनीटात चालणे हे सर्व पालन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. काही वेळेस काही अपरिहार्य कारणाने ते शक्य झाले नाही. परंतु अशा वेळी आमचे ॲडमीन निराश होऊ न देता माझ्यासारख्या सहभागीना प्रोत्साहन दिले.
मी ज्यावेळी मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता त्यावेळी एचबीएवनसी ची पातळी ८.१% होती. (०३.०१.२०२५ चा रिपोर्ट). त्यावेळेपासनूच मी डॉ दीक्षित जीवनशैलीचे अनकुरण सुरू केले होते. ९० दिवसाचा चॅलेंज सुरू करताना ही पातळी ६.६% पर्यन्त खाली आली होती.
90 दिवसानंतरचे अंतिम निकाल:
एचबीएवनसी %: ६.६ → ६.३
वजन: ५९ किलो→ ५६.५० किलो
पोटाचा घेर: ९२ → ९१ सेंमी
डॉ दीक्षित जीवनशैली सुरू केल्यापासनू रक्तातल्या साखरेच्या पातळीत चांगला फरक पडला आहे. माझ्या मधुमेहाच्या डॉक्टरांनी गोळी सकाळी अर्धी आणि रात्री अर्धी घ्यायला सांगितली आहे, ज्याची मात्रा पूर्वी एक एक गोळी होती. त्यामुळे मी डॉ दीक्षित जीवन शैली चे पालन नेहमीसाठी करायचे ठरवले आहे. तसेच या अभियानात सामील होण्यासाठी इतरांना देखील सांगणार आहे.
माझ्या या सर्व प्रगतीत मी डॉ. दीक्षित सरांचे आभार व्यक्त करतो. तसेच या माझ्या प्रगती मध्ये आपल्या ग्रपु मधील ॲडमीन श्रीनिवास बोलाबत्तीन सर, निखिल नाफडे सर व ग्रपु मधील सदस्य याचा वाटा आहेच कारण ग्रपु मधील इतर सदस्यांचे प्रयत्न, ग्रपु मधील पोस्ट ई. मला प्रेरणा देणारे ठरले. तसेच माझ्या सौभाग्यवतीचा (सौ संगीता येवतीकर) देखील मोठा वाटा आहे कारण तिने मला डॉ दीक्षित जीवन शैली चा डायट न कंटाळता दिला ज्यामुळे मला ही प्रगती साधता आली.


