आजची यशोगाथा : श्रीकांत दामोदरराव राळेगणकर ( ४ डिसेंबर )

0

आजची यशोगाथा : श्रीकांत दामोदरराव राळेगणकर ( ४ डिसेंबर )

परिचय पत्र

नाव: श्रीकांत दामोदरराव राळेगणकर
ईमेल: ralegankar@gmail.com
वय: ५१ वर्षे
उंची: १८० सेमी
निवासस्थान: छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)
व्यवसाय: टॅक्सी कॉन्ट्रॅक्ट
गट: छत्रपती संभाजीनगर
मोबाईल: ९५७९८०१७७७

मला मागील ६ वर्षांपासून उच्च रक्तदाब आणि वजन वाढ होत असल्यामुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. मला डॉ. दीक्षित लाइफस्टाइल आणि ९०दिवसांच्या वेटलाॅस चॅलेंज बद्दल माहिती माझे मित्र श्री. शैलेश कुलकर्णी यांच्याकडून मिळाली. हे चॅलेंज ०१.०६.२०२५ पासून सुरू होणार हे कळल्यावर मी डाॅ.दीक्षित आहारयोजना समजून घेऊन अंमलात आणण्याचा निर्णय घेतला.

माझ्या कुटुंबीयांना तसेच मित्रांना वाटत होते की मी आरंभशूर असून काही दिवसांनी कदाचित सोडून देईन, विशेषतः पोळा, गणपती उत्सव अशा सणांमुळे मला हे जमणार नाही. पण मी पूर्ण मनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले.
मी डाॅ.दीक्षित आहारयोजना ग्रुपच्या ‍ अ‍ॅडमिन सांगितल्या प्रमाणे दोन वेळेच्या खाण्याची पूर्ण शिस्त पाळली.
दररोज दोन वेळच्या जेवणाचे फोटो शेअर केले.

दररोज साधारण ५ ते ६ किमी चालत होतो. नियमित व्यायाम केला. समूहात शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या.

पहिल्या महिन्यात (३०.०६.२०२५ रोजी):
माझे वजन ८५ किलोवरून ८२ किलोवर आले —३ किलो वजन कमी झाले.
मागील ६ वर्षांपासून माझे वजन ८५ ते ९० किलोदरम्यान स्थिर होते. ते महिनाभरात सहजपणे कमी झाले.
माझ्या उच्च रक्तदाबासाठी ८० मिलिग्रॅम ची गोळी होती ती डॉक्टरांनी ४० मिलिग्रॅम वर आणली.

दुसऱ्या महिन्यात (३०.०७.२०२५ रोजी):
वजन ८२ किलोवरून ८० किलो झाले — आणखी २किलोने घट झाली.

९० दिवसांनंतरचा अंतिम निकाल:
एचबीएवनसी: ५.४ (सुरुवात) → ५.४ (शेवट)
वजन: ८५ किलो → ७८ किलो
कंबर: १०० सेमी → १०० सेमी (बदल नाही)

हा माझ्या आयुष्यातील मोठा बदल होता –
सुरुवातीला मला खूप भूक लागत होती आणि त्यामुळे चिडचिड व्हायची. पण चॅलेंज नीट समजून घेतल्यावर आणि पाळल्यावर खाण्यावर नियंत्रण मिळाले.
मी या डाॅ.दीक्षित आहारयोजना सुरु केल्यावर साखर, चहा आणि सर्व गोड पदार्थ पूर्णपणे बंद केले.
आता माझी गुडघेदुखी बंद झाली आहे, शरीर खूप हलके वाटते, आळस कमी झाला आहे.
आधी जेवणानंतर सुस्ती यायची, ती आता येत नाही.

या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित, आमचे अ‍ॅडमिन श्री. विनायक बोलाबत्तीन सर आणि श्री. निखिल नाफडे सर यांचा मनापासून आभारी आहे.

मराठी शब्दांकन :
डाॅ. सौ. सुहासिनी सुनिल देशपांडे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts