आजची यशोगाथा : शिल्पा रिसबूड
परिचय पत्र
नाम: शिल्पा रिसबूड
आयु: ७० वर्ष
ऊंचाई: १५० से.मी.
निवास: मुंबई
व्यवसाय: सेवानिवृत्त
समूह: मुंबई PDND
मोबाइल: ९९३०९२०३६५
मी पूर्व-मधुमेही आहे. माझे वजन वाढत चालले होते. माझ्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चालली होती. मला सतत थकवा जाणवत असे आणि चालण्याची क्षमता कमी झाली होती. मला जिने चढणे-उतरणे त्रासदायक झाले होते.
डॉ. दीक्षित सरांचे 90 दिवसांचे चॅलेंज ऐकून मला खूप उत्सुकता वाटली. मी त्यावेळी DRC ऑफिसमध्ये चौकशी केली. तेथील टीमकडून संपूर्ण माहिती मिळाली. डाएट, चालणे, व्यायाम याबाबत स्पष्ट मार्गदर्शन मिळाले. रिपोर्ट्स व डॉक्युमेंट्स तयार करण्यातही टीमने खूप मदत केली.
मी 9 जून 2025 पासून डॉ. दीक्षित जीवनशैली सुरू केली. सुरुवातीला थोडे कठीण वाटले, पण हळूहळू सवय लागली. घरच्या घरी बनवलेले साधे अन्न, वेळेवर जेवण, आणि चालणे यामुळे शरीरात फरक जाणवू लागला.
पूर्वी मला 3 ते 3.5 किमी चालणे कठीण जात होते. आता मी सहजपणे 5 किमी चालू शकते. अॅसिडिटी खूप कमी झाली आहे. सण-समारंभात थोडा डाएट बिघडला, नाहीतर एचबीएवनसी अजून थोडा कमी होऊ शकला असता.
व्यायामामुळे माझी ऊर्जा वाढली आहे. आत्मविश्वास वाढला आहे. मानसिक स्थैर्य आले आहे. चालण्याबरोबरच प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि योगासनांचाही मला फायदा झाला.
डॉ. दीक्षित सरांचे मार्गदर्शन, त्यांची शिस्तबद्ध पद्धत, आणि टीमचे सातत्यपूर्ण सहकार्य यामुळेच आज माझ्या जीवनात हा सकारात्मक बदल शक्य झाला आहे.
मी डॉ. दीक्षित सर, अॅडमिन पूजा पवार आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते.


