आजची यशोगाथा : विजय उगले

0

आजची यशोगाथा : विजय उगले

परिचय पत्र

नाव: विजय उगले
वय: ३६ वर्षे
उंची: १७८ से.मी.
वास्तव्य: नाशिक
व्यवसाय: व्यवसाय
समूह: नाशिक ग्रुप
मोबाईल: ९०९६१८१३७८

मला बराच काळ सातत्याने वजन वाढणे, आळस व थकवा यांचा त्रास होत होता. याचा माझ्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत होता. DRCC ग्रुपच्या माध्यमातून मला डॉ. दीक्षित लाइफस्टाइल आणि ९० दिवसांच्या चॅलेंजची माहिती मिळाली. जून २०२५ पासून हे चॅलेंज सुरू होणार असल्याचे समजताच मी त्यात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला.
रक्षाबंधन आणि गणपतीसारखे सण जवळ येत असल्यामुळे कुटुंबीय व मित्रांना थोडी शंका होती, तरीही मी पूर्ण मनापासून हे चॅलेंज स्वीकारले. कार्यक्रमात शिकवलेली शिस्त मी काटेकोरपणे पाळली. जेवणाचे फोटो, व्यायामाचे अपडेट्स नियमितपणे शेअर केले. पहिल्या महिन्यात माझे २ किलो वजन कमी झाले. त्यानंतरही सातत्याने वजन घटत गेले. आहारयोजना पाळल्यामुळे जीवनशैलीत मोठे सकारात्मक बदल जाणवले. मी अधिक ऊर्जावान, उत्साही व प्रेरित वाटू लागलो.
९० दिवसांच्या शेवटी झालेले बदल:
एचबीएवनसी: सुरुवातीला ५.२० → शेवटी ५.१
वजन: ८५ किलो → ८०.५ किलो
कंबर: ११४ से.मी. → १०९ से.मी.
इतर सुधारणा:
सुदृढ व संतुलित आहाराची सवय लागली, चेहऱ्यावर तेज वाढले. दिवसभर ऊर्जा जाणवणे, आत्मविश्वास वाढणे व सतत प्रेरित राहणे ही माझ्यासाठी सर्वात मोठी जाणीव ठरली. माझ्यातील सकारात्मक बदल इतर लोकांनाही जाणवू लागले.
या यशासाठी आणि सततच्या मार्गदर्शन व पाठिंब्यासाठी डॉ. दीक्षित सर, नाशिकचे अ‍ॅडमिन टीममधील विजय सर व नंदन सर तसेच DRC नाशिकच्या फॉलो-अप घेणाऱ्या सर्व स्टाफचे मी मनापासून आभार मानतो.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts