आजची यशोगाथा : वसुधा जठार
परिचय पत्र
नाव: वसुधा जठार
वय: ५५ वर्षे
उंची: १५५ सेंमी
वास्तव्य: जयपूर
व्यवसाय: गृहिणी
समूह: RMI-PDND
मोबाईल: ९३७०१५६०७५
मी कोविड च्या दरम्यान व्हीडीओ बघुन डॉ दीक्षित जीवनशैली अंगिकारत होतेच. तेव्हा डायट प्लॅन असा काही नव्हता. फक्त ५५ मिनिटात २ वेळा जेवणे, मग अगदी गोड सुद्धा होत होते. त्यावेळेच्या व्हॉट्सॲप ग्रुप वर माझी स्टोरी सुद्धा आली होती. पण नंतर हळुहळू खाण्याच्या सवयी बिघडत चालल्या होत्या. व्यायाम मात्र रविवार सोडून निष्ठेने सुरू होता. अचानक एकदा व्हीडीओ बघतांना चॅलेंज बद्दल समजले. मग त्यात भाग घेतला. सव्वा दोन महिने अगदी सुरळीत सर्वसुरू असताना सासुबाइंचे खुब्याचे हाड मोडले व मला प्रयत्न करूनही वेळेवर खाणे, व्यायाम करणे अशक्य झाले. ग्रुपवर सर्वांचे पोस्ट बघत होतेच. यातच ३१ऑगस्ट पण उजाडला. व्यायाम वेळ मिळेल तसा, जमेल तो करत होतेच. पण अचानक कविता मेहेंदळे यांचा मेसेज आला. कमीत कमी रक्त परीक्षण करून ट्रॅकर फॉर्मतरी भरा. असे त्यांनी म्हटले मग लगेच रिपोर्ट काढले. पोटाचा घेर मात्र जेव्हा मोजला (जवळ जवळ १० cm कमी झाले) तेव्हा मात्र मी निर्धार केला की आता स्वतःसाठी मी ही लाइफस्टाइल कायमची स्वीकारलीच पाहिजे. ग्रुपचे एडमिन श्री. संजीव सिंग, श्री. आहेर व कविता मेहेंदळे जातीने जेवणाचे फोटो, वॉकिंग चे फोटो यांना उत्तेजन देत होते. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे. डॉ. दीक्षित यांनादेखील मनापासून धन्यवाद.


