आजची यशोगाथा : लता पोखरकर

0

आजची यशोगाथा : लता पोखरकर

परिचय पत्र

नाव : लता पोखरकर
वय: ४४ वर्षे
उंची: १५७ सेंमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: छ. संभाजीनगर
समूह: छ. संभाजीनगर
मोबाईल: ७५१७५१६४१५

माझ्या परिवर्तनाची कहाणी

नोव्हेंबर २०२४ मध्ये मला मधुमेह झाल्याचे निदान झाले जेव्हा मला शस्त्रक्रिया करावी लागली. माझे एचबीएवनसी ८.३% होते. मला भीती वाटू लागली की माझा आजार कधीच बरा होणार नाही आणि मला आयुष्यभर औषध घ्यावे लागेल. पायऱ्या चढताना मला श्वास घेण्यास त्रास होत असे आणि माझ्या हातांपायात गोळे यायचे. लहानपणापासून मी पहाटे ४-५ वाजता उठून व्यायाम करत होते तरी, मला मधुमेह कसा झाला या विचाराने मी खूप दुःखी होते आणि औषधांचा ही खूप त्रास होत होता. मला आयुष्यभर ते घ्यायचे नव्हते. एके दिवशी, मला डॉ. दीक्षित सरांचा व्हिडिओ दिसला. व्हिडिओ पाहिल्यानंतर, मी स्वतःहून या जीवनशैलीचे पालन करू लागले. दोन महिन्यांतच माझे एचबीएवनसी ७.११% पर्यंत खाली आले. नाशिकच्या मोरे सरांनी मला छत्रपती संभाजीनगर ग्रुपमध्ये जोडले आणि तिथूनच माझा मधुमेहमुक्तीचा प्रवास सुरू झाला.
मी ९० दिवसांच्या वजन कमी करण्याच्या आव्हानात उत्साहाने भाग घेतला. दररोज सकाळी आणि संध्याकाळी ग्रुपवर माझ्या जेवणाच्या ताटाचे फोटो उत्साहाने शेअर केले. दररोज ६-७ किमी चालत असे. ग्रुप अॅडमिन श्रीनिवास सर आणि निखिल नाफडे सर मला दररोज प्रोत्साहन देत असत. दर आठवड्याच्या शेवटी काही ना काही उपक्रम होत असत आणि मी त्यात मोठ्या उत्साहाने भाग घेत असे. तीन महिन्यांत मी एक-दीड किलो वजन कमी केले. माझ्या पोटाचा घेर ९२ सेमी वरून ८९ सेमी पर्यंत कमी झाला आणि माझे एचबीएवनसी ६.९ पर्यंत कमी झाले. या यशाने मी खूप आनंदी आहे. मी निरोगी जीवनाकडे पावले टाकत आहे. मला विश्वास आहे की मी लवकरच मधुमेहमुक्त होईन. याचे सर्व श्रेय डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या निस्वार्थ कार्याला जाते. मी डॉ. दीक्षित सर आणि संपूर्ण अॅडमिन टीम आणि सरांच्या कार्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानते. मी आमचे अॅडमिन श्रीनिवास सर, नाफडे सर आणि या प्रवासात मला पाठिंबा आणि मार्गदर्शन करणाऱ्या मेघना मॅडम, डीटीसीच्या अनिता बहेकर मॅडम, रत्नपारखी सर, भालेराव सर या सर्वांचे विशेष आभार मानते.
मी देवाकडे प्रार्थना करते कि डॉ. दीक्षित सर हे प्रेरणादायी कार्य अविरत करत राहावे आणि आपण सर्वजण त्यांचे कार्य पुढे नेऊ. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मी सल्ला देते की ही जीवनशैली वापरून पहा, तुमच्यातही फरक पडेल.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts