आजची यशोगाथा : राहुल मुळूक ( २६ फेब्रुवारी २०२६ )

0

आजची यशोगाथा : राहुल मुळूक ( २६ फेब्रुवारी २०२६ )

परिचय पत्र

नाव: राहुल मुळूक
वय: ४५ वर्षे
उंची: १६५ सेंमी
वास्तव्य: पिंपरी-चिंचवड
व्यवसाय: नोकरी
समूह: पिंपरी-चिंचवड समूह
मोबाईल: ९४०४३८३५८०

मी गेल्या वर्षीऑगस्ट मध्ये पायाला छोटीसी झालेली जखम बरी होत नसल्यामुळे शुगर टेस्ट केली असता शुगर १९० निघाली. डॉक्टरांनी गोड बंद करण्याचा व चालण्याचा सल्ला दिला परंतु कामकाजात व्यस्त असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. परंतु एप्रिल मध्ये पुन्हा शुगर चेक केली तेंव्हा २६० आली. डॉक्टरांनी गोळ्या चालू केल्या. त्यानंतर मी स्वत: व घरातील सर्वचिंतेत पडले. लोक शुगर बद्दल व शुगर पेशंट विषयी काहींना काही सांगू लागले . ते ऐकूण मला खूप टेंशन आले. सहज यूट्यूब वर डॉ. दीक्षित सरांचा विडियो बघितला व जे.एम. रोडच्या सेंटरला जाऊन भेट दिली. तेथील सरांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे डायट व चालणे चालू केले. परंतु कामामुळे ते रेग्युलर होत नव्हते. तेवढ्यात आपल्या या चॅलेंज ची घोषणा झाली व मनातून या चॅलेंज मध्ये भाग घ्यायचा असे ठरवले. चॅलेंज मध्ये भाग घेतल्यावर अंजली मॅडम तसेच कविता मॅडम यांनी खूप छान मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज माझी एचबीएवनसी ५.९ वरून ५.४% झाली व मी मधुमेह-मुक्त झालो. माझे वजन साधारण ९ ते १० किलो कमी झाले. या माझ्या चॅलेंज मध्ये मला डायट व वॉकिंग करण्यास माझी पत्नी व माझ्या मुलींनी मला खूप मदत केली. मी डॉ. दीक्षित सर, अंजली मॅडम,कविता मॅडम, माझी पत्नी व मुलींचा आभारी आहे.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts