आजची यशोगाथा : योगेश गारजकर
परिचय पत्र
नाव : योगेश गारजकर
वय: ४६ वर्षे
उंची: १६७ सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: छ. संभाजीनगर
समूह: छ. संभाजीनगर
मोबाईल: ९४०३०८९९४९
ई मेल: yogeshgarajkar91356@gmail.com
मी योगेश गारजकर मला डॉ. दीक्षित सरांच्या जीवनशैलीची माहिती २०१८ ला पहिल्यांदा मिळाली, पण माझ्याकडून काही पाळणे झाले नाही. ०१ जून २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणाऱ्या “डॉ. दीक्षित ९० दिवसीय वेट लॉस आणि मधुमेह रिवर्सल चॅलेज ” मध्ये भाग घेतला आणि या जीवनशैलीचे पालन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रक्त चाचणी मध्ये एचबीएवनसी १०.८ % व उपाशीपोटी इंसुलिन १७.३७ यूनिट निघाले. वजन ८० किलो आणि पोटाचा घेर ११० सेंमी होता.
माझे तीन महिन्यात ६ किलो वजन कमी झाले व एचबीएवनसी १०.८ % वरून ८.५ % झाले तसेच पोटाचा घेर ११० सें मी वरून १०० सेंमी वर आला. तसेच मधुमेहा ची गोळी २ mg दोनवेळा होती ती १ mg झाली आहे. एक सांगायचं आहे वरील बदल फक्त ९० दिवसापैकी ७० दिवस आहार, व्यायाम योजना पाळून झाले आहे दुर्दैवाने मी या चॅलेंजचे ९० दिवस (खाजगी व घरगुती अडचणी मुळे) संपूर्णपणे पाळू नाही शकलो. आता मला खूप छान व हलके हलके वाटतंय. या पुढेही मी डॉ दीक्षित जीवनशैली चे पालन करणार आहे.
मला राजीव भालेराव सर तसेच श्रीनिवास बोलाबत्तीन सर, निखिल नाफडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डॉ दीक्षित सरांना खूप खूप धन्यवाद. तसेच यासाठी माझ्या पत्नीला पण धन्यवाद देईन कारण आहार योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तिने मला सहकार्य केले.
सर्वाना धन्यवाद.


