आजची यशोगाथा : यदुनाथ महाराज ( २ एप्रिल २०२६ )
परिचय पत्र
नाव: यदुनाथ महाराज
वय: ६१ वर्षे
उंची :१६२ सेंमी
व्यवसाय: सेवानिवृत्त
वास्तव्य: लातूर
समूह: RMI DYDN
मोबाईल: ७७९६७९३२५३
मला २०१७ साली शुगर डिटेक्ट झाली. २०१९ साली माझे बायपास ऑपरेशन झाले.त्यानंतर माझी शुगर आटोक्यात येतच नव्हती. ऑपरेशन व शुगर मुळे मला दातांचे व डोळ्यांचे विकार सुरु झाले. मे-२०२५ रोजी माझे मित्र संजीव गोबाडे यांनी डॉ दीक्षित जीवनशैलीबद्दल सांगितले व वंदना जोशी, नाशिक यांना जोडून दिले. मॅडमनी मला डॉ दीक्षित जीवनशैलीची नीट ओळख करून दिली. त्याप्रमाणे मी ही जिवनशैली पूर्णपुणे अंगिकारली. योगायोगाने ७ वा वेटलॉस व मधुमेह मुक्त कार्यक्रम जाहीर झाला. मॅडमनी मला त्यात जोडून दिले. मी दररोज सकाळी ४.५० कि.मी.चालण्याचा नियमीत व्यायाम करत असे. सकाळी कमी दुधाचा बिन साखरेचा चहा फक्त एकदाच घेत असे. त्यानंतर बरोबर दुपारी १२ ते १२.३० घ्या आत व संध्याकाळी ७. ते ७.३० घ्या सुमारास जेवण घेत असे. जेवणात मी प्रथम भिजवलेले शेंगदाणे, चार बदाम, चार अक्रोड, संलाद, मोड व त्यानंतर नियमीत जेवण घेत असे. दोन जेवणाच्या मध्ये मी काहीही घेतले नाही. तीन महिन्यांनंतर मी मधुमेही मधून पूर्व-मधुमेही झालो आहे. लवकरच मी मधुमेहमुक्त होईन यांची मला खात्री आहे. माझी मधुमेह व हृदयविकाराची औषधे मला पूर्णपणे बंद करण्याची माझी इच्छा आहे व ती बंद होतील याची देखील मला खात्री आहे. ही जीवनशैली मी यापुढेही चालू ठेवणार आहे.
मी आदरणीय डॉ दीक्षित सर, वंदना मॅडम, पद्मा मॅडम यांचे खूप खूप आभार मानतो. मला या मार्गात आणणारे संजीव गोबाडे, मला नियमीत गुगल फॉर्म व इतर संगणकीय कामात मदत करणारा माझा मुलगा सुधन्वा व माझा आहार सांभाळण्याचे काम करणारी माझी पत्नी सौ. चित्रा यासर्वांचे मी खूप खूप आभार मानतो.
(मराठी पुनर्लेखन: डॉ रत्नाकर गोरे)


