आजची यशोगाथा : मिलिंद भडेकर

0

आजची यशोगाथा : मिलिंद भडेकर

परिचय पत्र

नाव: मिलिंद भडेकर
वय: ४९ वर्षे
उंची: १६७ सेंमी
व्यवसाय: सोनार काम
वास्तव्य: गिरगाव, मुंबई
समूह: ठाणे DCC2
मोबाईल: ७७३८५२९६९२

सुरुवातीला मला सोयरेसिस चा त्रास सुरू झाला त्वचारोग तज्ञांकडे गेलो असता रक्त तपासणी करायला सांगितले. त्याच्या निदानात एचबीए१सी- १०.२७% व वजन ८० किलो निघाले. तसेच डोकेदुखी अपचनाचा त्रास नेहमी असायचा. मधुमेहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो कसा कमी करता येईल या विवंचनेत असताना यूट्यूब वर डॉ. दीक्षित सरांचे व्हिडिओ पाहिले. त्याखाली क्लिप मध्ये असलेल्या फोन नंबर वरुन ठाणे DCC2 सेंटर चा नंबर मिळाला. ठाणे DCC2 सेन्टरच्या मार्गदर्शना नुसार माझे एचबीए१सी ५.७% च्या आत वजन ६७ किलो असावे असे सांगण्यात आले.
मी तीन महिन्याचे चॅलेंज स्वीकारले, कुठले ही औषधे ना घेता ही जीवन शैली चालू केली दि. ११.११.२०२५ पासून.
डायट सुरु करण्या आधी जीवन शैली: जेवणाचा काही वेळकाळ नव्हता, दुपारी तीन-चार ला जेवण व्हायचे आणि रात्री दोनला कधी तीनला जेवण व्हायचे, कामाची पद्धत दिवस भर मांडी घालून बसणे, दिवस भर चहा पिणे, वडापाव पाव सामोसे, कचोरी हे असेच नाश्ता करणे. दीक्षित जीवन शैली चालू केल्या पासून दुपारी १ आणि रात्री ८ या भुकेच्या वेळा ठरल्या. मध्ये मी फक्त पाणी किंवा ग्रीन टी पितो. जेवण्याच्या वेळा मी तंतोतंत पालन करतो. प्रथम मी ४ बदाम, १ अक्रोड, काकडी, मूळा, टोमॅटो, कोबी, मोड आलेले मूग उकडून आणि मग जेवण, आणि जेवणात मी सर्व काही खात होतो.
रात्री ७ तास पूर्ण झोप घेतो, रोज कसे ही करून १ तास एकमार्गी चालायचा प्रयत्न करतो, जर एखाद दिवस मिस झाला तर संध्याकाळी चालून पूर्ण करतो.
डायट चालू केल्या पासूनचे अनुभव अविश्वासनीय होते, एक महिन्यातच एचबीए१सी – ७.४% झाला त्यामुळे जोमाने मधुमेह मुक्त होण्याच्या तयारीला लागलो. पुढच्या महिन्यात एचबीए१सी- ६.५% व वजन ६८ किलो झाले. आता लक्ष्य जवळ आले होते. आता ०१.०३.२०२६ रोजी माझे एचबीए१सी- ५.४% व वजन ६५ किलो आहे. म्हणजेच मी आता पूर्णपणे मधुमेह मुक्त झालो आहे.
सोरासिस चा त्रास पूर्ण पणे बरा झाला आणि डोकेदुखी पण पूर्ण कायम बरी झाली. कोणतेही औषध न घेता ही जीवनशैली चालू केली.
माझ्या जेवणाच्या वेळा पाळण्यात माझ्या बायकोचा आणि माझ्या मुलांची मोलाची मदत झाली. त्यांचे मनापासून आभार, आणि ठाण्याचे ऍडमिन व पूर्ण टीम काहीही अडचण आली तर फोन वर ते आपल्या समस्यांचे निराकरण करायचे. विशेष आभार डॉ दीक्षित सरांचे. मधुमेह मुक्त देश करायचा त्यांचा ध्यास.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts