आजची यशोगाथा : मंजुश्री जोशी ( १४ जानेवारी २०२६ )
परिचय पत्र
नाव : मंजुश्री जोशी
वय: ५८ वर्षे
उंची: १५७ सेंमी
व्यवसाय: निवृत्त आयटी व्यावसायिक
वास्तव्य: पुणे
समूह: पुणे DYDN
मोबाईल: ९८२२७७८९२२
ई मेल: manjushree.s.joshi@gmail.com
माझ्या ५० व्या वाढदिवसानंतर, गेल्या ७-८ वर्षांपासून मी मधुमेह आणि लठ्ठपणाशी लढा देत होते. मधुमेहामुळे थायरॉईड, बीपी, वजन वाढणे आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित समस्या निर्माण झाल्या, ज्याचा माझ्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आणि मी पूर्णपणे खचून गेले होते. मधुमेहाचा माझ्या दृष्टीवरही परिणाम झाला आणि मला दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन करावे लागले. कोरोनाच्या काळात, संसर्ग झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आतच माझी एचबीएवनसी पातळी ७.५ वरून थेट ११.५ % वर पोहोचली.
मी ‘इंटरमिटंट फास्टिंग’ सुरू केले आणि त्याचा चांगला परिणाम झाला; माझे वजन ८६ किलोवरून ७८ किलोवर आले आणि काही महिन्यांत एचबीएवनसी ७ % च्या जवळ आले. पण त्यापेक्षा खाली ते जात नव्हते. मी डॉ. दीक्षित यांच्या जीवनशैलीचे व्हिडिओ देखील पाहिले होते, परंतु दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ मी स्वतःहून ती जीवनशैली टिकवू शकले नाही.
एप्रिल २०२५ मध्ये, मी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे ठरवले आणि महिनाभर दिवसातून दोन वेळा जेवण्याचा नियम पाळला. मेघना भिडे मॅडम यांच्याशी बोलल्यानंतर मला १ जून २०२५ पासून सुरू होणाऱ्या ‘चॅलेंज’बद्दल माहिती मिळाली आणि मी त्यात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. यावेळी मी माझे सर्वस्व झोकून देण्यास तयार होते. आणि त्यानंतर जे काही घडले ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते.
मी पूर्ण निष्ठेने यात सहभागी झाले — जेवणाचे फोटो शेअर करणे, व्यायामाचे अपडेट्स देणे आणि प्रोग्राममध्ये शिकवलेल्या शिस्तीचे पालन करणे मी सुरू ठेवले. पहिल्याच महिन्यात माझा एचबीएवनसी ८.७ वरून ७.९% वर आला, उपाशीपोटी इन्सुलिन १८.६ वरून १३.१ यूनिट वर आले आणि माझे ३ किलो वजन कमी झाले. पुढच्या काही महिन्यांत या सर्व पॅरामीटर्समध्ये मला सातत्याने सुधारणा दिसून आली.
९० दिवसांच्या शेवटी झालेले बदल:
एचबीएवनसी: [८.७] → [६.३]%
वजन: [७६] → [६७] किलो
कंबर: [११४] → [१०४] सेमी
इतर सुधारणा: डॉक्टरांनी माझी औषधे कमी केली. मी मधुमेहाच्या विळख्यातून बाहेर पडून ‘प्री-डायबेटिक’ स्थितीत आले.
सातत्याने निरोगी जीवनशैली राखण्याचे महत्त्व मला उमजले, ही माझ्यासाठी सर्वात मोठी जाणीव होती. या जीवनशैलीमुळे मी खाण्याची ओढ आणि चहाच्या व्यसनावर उत्तम नियंत्रण मिळवले आहे. आता ही जीवनशैली आयुष्यभर पाळण्याचा आत्मविश्वास मला मिळाला आहे.
मी डॉ. दीक्षित, मेघना भिडे, करिष्मा साळवी, विवेक कुलकर्णी आणि या टीममधील सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनासाठी आणि बहुमोल मदतीसाठी त्यांचे मनापासून आभार मानते. हजारो लोकांच्या आयुष्यात असे अप्रतिम बदल घडवून आणल्याबद्दल मी डॉ. दीक्षित यांची ऋणी आहे; माझ्या मनापासून, अगदी अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद.
(मराठी भाषांतर : श्रीनिवास बोलाबत्तीन)


