आजची यशोगाथा : प्रीती देसाई ( ८ एप्रिल २०२६ )
परिचय पत्र
नाव: प्रीती देसाई
वय: ४३ वर्षे
उंची: १५८ सेंमी
वास्तव्य: बेंगळुरू
व्यवसाय: गृहिणी
मोबाईल: ९९८०५ ५४१३१
मी बेंगळुरूमध्ये राहते. सप्टेंबर २०२५ मध्ये केलेल्या नियमित तपासणीत मला कळले की माझे एचबीएवनसी ७.२% आहे, वजन ७९ किलो आहे आणि मी मधुमेहाच्या अवस्थेत आहे.
माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मी YouTube वर फिटनेस अॅक्टिव्हिटीज आणि जीवनशैली शोधत होते आणि मला डॉ. दीक्षित लाइफस्टाइल चॅनेलबद्दल माहिती मिळाली. या चॅनेलवरून मला श्री. प्रशांत गाडगीळ यांचा संदर्भ मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या जीवनशैलीतील बदलांचा प्रवास सुरू केला. मी आहार योजना पाळली, माझ्या खाण्याच्या सवयी बदलल्या आणि भूक नियंत्रणात ठेवली. मी आठवड्यातून तीन वेळा बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली आणि दररोज ४५ मिनिटे चालणे सुरू केले. दोन महिन्यांतच मला चांगले परिणाम दिसले; नोव्हेंबर २०२५ मध्ये माझे एचबीएवनसी ५.६% झाले आणि मार्च २०२६ मध्ये ते ५.३% झाले.
कालावधी: १५-०९-२०२५ ते २४-०३-२०२६
एचबीएवनसी: ७.२ → ५.३
फास्टिंग इन्सुलिन: ७ → ८.२
वजन: ७९ किलो → ६५ किलो
कंबर घेर: १०१ सेंमी → ९७ सेंमी
मी डॉ. दीक्षित लाइफस्टाइल आणि श्री. प्रशांत गाडगीळ सर यांचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल मी मनापासून आभार मानते.
मी पुढेही ही जीवनशैली कायम ठेवणार आहे.
(इंग्रजी संपादन: डॉ. रत्नाकर गोरे)


