आजची यशोगाथा : प्रशांत ढिसले ( २४ नोव्हेंबर)

0

आजची यशोगाथा : प्रशांत ढिसले ( २४ नोव्हेंबर)

परिचय पत्र

नाव: प्रशांत ढिसले
वय: ६० वर्ष
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: सेवानिवृत्त
ग्रुप: पिंपरी चिंचवड
मोब.: ८९७१६५५३३२

मी, प्रशांत गोपालराव ढिसले, पुणे येथील एक ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्ति, १२ ऑगस्ट, २०२४ पासून उच्च रक्तदाब, मधुमेह, वजन वाढणे, घोरणे, पाठदुखी आणि वारंवार लघवी येणे या समस्यांनी ग्रस्त होतो. या समस्यांचा माझ्या दैनंदिन जीवनावर खूप प्रभाव पडत होता.

ऑगस्ट २०२४ मध्ये, मला यूट्यूबवर डॉ. दीक्षित जीवनशैलीचा शोध लागला आणि मी २० ऑगस्ट, २०२४ रोजी पुणे येथील डायबिटीज रिव्हर्सल सेंटर (DRC) येथे गेलो. केंद्रातील स्वयंसेवकांनी जीवनशैली चांगल्या प्रकारे समजावून सांगितली आणि मी तेव्हापासून नियमितपणे त्याचे पालन करत आहे.
१० महिन्यांत, मी माझे वजन १२७ किलो वरून १०२ किलो, माझे फास्टिंग इन्सुलिन लेव्हल १२३ वरून ६ आणि माझे HbA1C लेव्हल ९.१ वरून ५.७ इतके कमी केले, तेही कोणत्याही औषधाशिवाय. आता मी स्वस्थ आहे. मला रक्तदाब, मधुमेह, घोरणे किंवा पाठीचा त्रास नाही. मी दररोज ५ ते १२ किमी पर्यंत चालू शकतो आणि मला वारंवार लघवीला जावे लागत होते ती समस्या नाहीशी झाली आहे.

मी माझ्या वैद्यकीय अहवालांसह डी. आर. सी. पुणे येथे जात असे आणि डी.आर.सी.सी. पुणे ग्रुपद्वारे ९०-दिवसांच्या डायबिटीज रिव्हर्सल आणि वजन कमी (DRWL) चॅलेंज बद्दल कळले. मी १ जून, २०२५ पासून सुरू झालेल्या या आव्हाना मध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला. मी प्रतिबद्ध राहिलो, जेवणाचे फोटो, व्यायामाचे अपडेट सामायिक केले आणि कार्यक्रमात शिकवलेल्या शिस्तीचे पालन केले.
९० दिवसांच्या समाप्तीनंतर, माझी HbA1C ची पातळी ५.७ ते ५.९, माझे वजन ९९ किलो आणि माझ्या कमरेचा घेर ११० सेमी झाला. माझ्यासाठी सर्वात मोठी अनुभूती म्हणजे माझ्या इच्छांवर नियंत्रण, शिस्त आणि माझ्या मानसिकतेत सुधारणा करण्याची क्षमता मला प्राप्त झाली.

मी डॉ. दीक्षित आणि आमच्या ग्रुपच्या प्रमुख, अंजलि पाठक मॅडम आणि कविता शिंदे मॅडम यांना त्यांनी केलेल्या सतत मार्गदर्शन आणि सहयोगाबद्दल आभारी आहे.

( मराठी भाषांतर: निखिल नाफडे.)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts