आजची यशोगाथा : प्रविण दौलताबादकर  ( २२ डिसेंबर )

0

आजची यशोगाथा : प्रविण दौलताबादकर  ( २२ डिसेंबर )

परिचय पत्र

नाव: प्रविण दौलताबादकर
वय: ५१ वर्षे
वास्तव्य: मुंबई
व्यवसाय: नोकरी – आयटी कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर
ग्रुप: मुंबई-DYDN
मोबाईल: ८८७९९१६६२०

मी वाढलेली रक्तातील साखर, वजनवाढ, सांधेदुखी, जास्त कोलेस्टेरॉल इत्यादी समस्यांनी त्रस्त होतो, ज्याचा माझ्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत होता.

२०२० साली मी यूट्यूबवरील व्हिडिओद्वारे डॉ. दीक्षित जीवनशैली फॉलो करण्यास सुरुवात केली. त्यामुळं जवळपास दोन वर्षे माझे वजन कमी झाले तसेच मधुमेहही नियंत्रणात राहिला. मात्र व्यस्त जीवनशैली व योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे हळूहळू पुन्हा वजन वाढू लागले व एचबीए वन सी चे प्रमाणही वाढले.

मे २०२५ मध्ये DRCC/YouTube द्वारे मला डॉ. दीक्षित जीवनशैली व ९० दिवसांचे चॅलेंज याबद्दल माहिती मिळाली. ०१/०६/२०२५ पासून सुरू होणारे हे चॅलेंज स्वीकारण्याची माझी पूर्ण तयारी होती. मात्र गणपती उत्सव, वाढदिवस, कौटुंबिक कार्यक्रम तसेच ऑफिसच्या कामासाठी पुण्याला साप्ताहिक प्रवास असल्यामुळे कुटुंबीय व मित्र थोडे साशंक होते.

या सर्व अडचणी असूनही मी डॉ. दीक्षित जीवनशैलीचे ९० दिवसांचे वजन कमी करण्याचे चॅलेंज स्वीकारले आणि जेवणाचे फोटो, व्यायामाचे अपडेट्स शेअर करत संपूर्ण शिस्तीने ते पूर्ण केले.

या ९० दिवसांच्या चॅलेंजदरम्यान माझ्या ग्रुप अ‍ॅडमिन्स मा. शिवानी पोतनिस व मा. पूजा पवार यांच्याकडून आहाराची योग्य निवड व आहाराची क्रमवारी याबाबत योग्य मार्गदर्शन मिळाले, ज्यामुळे आवश्यक ते बदल करता आले.

निकाल:
पहिल्या महिन्यात:
* वजन ६७.५५ किलोवरून ६५ किलो झाले (२.५५ किलो घट)
* एचबीए वन सी ७.८ वरून ७.२ झाले (०.६ ने घट)
* कंबर १०१ सेमी वरून ९८.५ सेमी झाली (२.५ सेमी घट)

पुढील दोन महिन्यांत:
* वजन ६०.६ किलो झाले
* कंबर ९१ सेमी झाली
* एचबीए वन सी ६.० झाले
* उपाशीपोटी इन्सुलिन ३.६४ झाले.

इतर सुधारणा (वार्षिक तुलनात्मक आकडे):
* कोलेस्टेरॉल: २३४ → १३७
* ट्रायग्लिसराइड्स: ३४४ → १४०
* किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन व लिपिड प्रोफाइल सर्वच सुधारले.

याशिवाय माझ्या आयुष्यात इतरही सकारात्मक बदल झाले आहेत – एकाग्रता वाढली, ऊर्जा वाढली आणि झोपेची गुणवत्ता सुधारली. जुने कपडे पुन्हा घालता येऊ लागले आहेत. पूर्वीपेक्षा स्वतःला १० वर्षांनी तरुण वाटते आणि दिसतो.

आता मित्र, नातेवाईक व सहकारी यांच्याकडून डॉ. दीक्षित जीवनशैली विषयी अनेक चौकशा येत आहेत.

डॉ. दीक्षित तसेच मुंबई-DYDN ग्रुपच्या अ‍ॅडमिन्स मा. शिवानी पोतनिस व मा. पूजा पवार यांचे त्यांच्या सततच्या मार्गदर्शन व पाठिंब्यासाठी मनापासून आभार.

आरोग्यदायी व सक्रिय आयुष्यासाठी डॉ. दीक्षित जीवनशैली आयुष्यभर फॉलो करण्याचा माझा निश्चय आहे.

मराठी अनुवाद:
डॉ. सुहासिनी सुनील देशपांडे

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts