आजची यशोगाथा : निलेश खरे
परिचय पत्र
नाव: निलेश खरे
उंची: १७९ सेंमी
वय: ४४ वर्षे
वास्तव्य: राहुरी, अहिल्यानगर
व्यवसाय: वैद्यकीय (B.H. M. S.)
मोबाईल: ९८५००३७०१४
मी राहुरी येथे गेले पंधरा वर्षापासून जनरल प्रॅक्टिस करतो…. प्रॅक्टिस मध्ये असल्यापासून बऱ्याच वेळा वजन कमी करण्याचे बरेच प्रकारचे प्रयत्न झाले परंतु खूप काही यश असे आले नाही
…. एक वर्षांपूर्वी राहुरी येथे डॉ दीक्षित सरांचे व्याख्यान ऐकले आणि तेव्हापासून असं वाटायला लागलं की हे एक वजन कमी करण्याचे साधन नाही तर ही जीवनशैली म्हणून आपण अवलंब करूय
ात…आणिकाय मग ऑगस्ट २०२५पासून सुरु केला हा प्रवास
… सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळेस ५५ मिनिटाच्या आत जेवणे सकाळी उठल्यावर व्यायाम आणि रात्री जेवण झाले की तीन किलोमीटर सायकलिंग…हा एक नियम बनवून घेतला
…आणि२ महिन्यातच फरक दिसायला लागला
..आधीवजन होते ११८ किलो … आणि आत्ता मार्च २०२६ ला आहे ९६ किलो … वजन तर कमी झालेच..पण दैनंदिन कामात उत्साह वाढला..आळस कमी झाला..
.खुपछान वाटतंय…. आणि जेव्हा माझे पेशंट आवर्जून विचारतात की डॉक्टर काय केले वजन कमी करण्यासाठी….. तेव्हा गर्वाने मी सांगतो की मी डॉ दीक्षित जीवनशैली अवलंबली आहे…
मी डॉ दीक्षित आणि त्यांच्यासहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो.


