आजची यशोगाथा : नमिता पिपालिया

0

आजची यशोगाथा : नमिता पिपालिया

परिचय पत्र

नाव : नमिता पिपालिया
वय: ५२ वर्षे
उंची: १५७ सेंमी
व्यवसाय: शिक्षक, टॅरोकार्ड रीडर आणि ब्रेथवर्क थेरपिस्ट
वास्तव्य: मुंबई
समूह: मुंबई DYDN
मोबाईल: ९८३३२६३०४३

माझ्या बालपणापासूनच मी लठ्ठपणाशी झगडत आहे. लॉकडाऊन दरम्यान माझे वजन खूप वाढले आणि माझ्या पायांचे स्नायू कमकुवत झाले. माझी चालण्याची आणि उभी राहण्याची क्षमता कमी झाली, त्यामुळे मी माझी शाळेतील नोकरी सोडली. मी बॅरिएट्रिक सर्जरी करण्याच्या उंबरठ्यावर होते. मी सॅटविक मूव्हमेंट लाइफ स्टाईल वापरून पाहिली, परंतु जास्त फळे, रस, खजूर, काजू आणि नारळाचे दूध नियमित सेवन केल्यामुळे माझ्या शरीरात मधुमेह आणि फॅटी लिव्हरचा त्रास वाढला ज्यामुळे मला दिवसभर पोटात उजव्या भागात मंद वेदना होत होत्या.
मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांचे चॅलेंज ची माहिती युट्युबच्या माध्यमातून समजली. हे चॅलेंज १ जून २०२५ पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर, मी त्यात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. माझे कुटुंबीय आणि मित्र साशंक होते, विशेषतः जैन सण पर्युषण आणि गणपतीसारखे आगामी सण येत असल्यामुळे. तरीही, मी हे आव्हान पूर्ण करण्याचा निश्चय केला होता. मी पूर्णपणे समर्पित राहिले – जेवणाचे फोटो शेअर करणे, व्यायामाचे अपडेट्स देणे आणि कार्यक्रमातील शिस्त पाळणे हे सर्व केले. मी चालू शकले नसले तरी, मी खुर्चीवर बसून व्यायाम केले.

पहिल्या महिन्यात माझे २ किलो वजन कमी झाले, एचबीएवनसी ६.६ वरून ५.९ वर आला. दुसऱ्या महिन्यात आणखी २ किलो वजन कमी झाले, एचबीएवनसी ५.७ वर आला आणि तिसऱ्या महिन्यात पुन्हा २ किलो वजन कमी झाले.

९० दिवसांच्या शेवटी:
एचबीएवनसी %: ६.६ → ५.६
वजन: ११० → १०४ किलो
कंबर: १३९.७ → १३२.८ सेंमी.

माझा लघवीचा संसर्ग बरा झाला. वारंवार लघवीला जाणे थांबले, त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारली. चालण्याची आणि उभी राहण्याची क्षमता खूप सुधारली आहे. त्वचा तजेलदार झाली आहे, सांध्यांचा ताठरपणा गेला आहे. आता मी नाचू शकते! मी खूप खूप आनंदी आहे!

माझ्यासाठी सर्वात मोठी जाणीव म्हणजे, डॉ. दीक्षित जीवनशैलीने खाण्यापिण्याच्या इच्छेवर आत्मनियंत्रण मिळवणे खूप सोपे झाले. आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी शिस्त निर्माण करणे खूप महत्वाचे आहे.
हे वेटलॉस चॅलेंज माझ्यासाठी खूप समृद्ध करणारा आणि परिवर्तनकारी अनुभव होता. माझ्या लक्षात आले आहे की, पूर्ण आणि संतुलित आहार घेणे किती महत्त्वाचे आहे.

‘नाही म्हणजे नाही’ हे साखरेलाही लागू होते.’
“मी आता ‘भोगी’ आहे, ‘रोगी’ नाही!”

आता मी कधीही माझ्या जुन्या जीवनशैलीकडे परत जाणार नाही.

डॉ. दीक्षित यांचे त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाबद्दल, डॉ. शिवानी पोतनीस आणि पूजा पवार यांचे आमच्या दैनंदिन जेवणावर आणि मासिक पॅरामीटर्सवर बारकाईने लक्ष ठेवल्याबद्दल आणि सर्व सहभागींना प्रोत्साहनपर आणि शिस्त लावणाऱ्या शब्दांनी प्रेरित केल्याबद्दल मी मनापासून आभार मानते. त्यांच्या मदतीशिवाय आणि पाठिंब्याशिवाय हे यश अशक्य होते.

जेव्हा मला कळले की हे आव्हान ०१/०६/२०२५ रोजी सुरू होणार आहे, तेव्हा मी सहभागी होण्याचा निर्धार केला. माझे कुटुंब आणि मित्र अनिश्चित असले तरी, विशेषतः गुरुपौर्णिमा, श्रावण महिना इत्यादी आगामी सणांमुळे, मी त्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करण्याचा दृढनिश्चय केला.

मी पूर्णपणे वचनबद्ध राहिलो – अन्नाचे फोटो साझा करणे, व्यायामाची माहिती देणे आणि कार्यक्रमात शिकवलेल्या कडक शिस्तीचे पालन करणे.

९० दिवसांच्या अखेरीस: HbA1c: ८.० → ६.९, वजन: ९० किलो → ८९ किलो, कंबर: ११९ सेमी → १११ सेमी

माझ्यासाठी सर्वात मोठ्या अनुभूतींपैकी एक म्हणजे वैयक्तिक अनुभूती – इच्छांवर आत्म-नियंत्रण मिळवणे, शिस्त विकसित करणे आणि मानसिकता सुधारणे. मी डॉ. दीक्षित सर, आमच्या मुंबई-डी वाय डी एन-ग्रुपच्या प्रशासक श्रीमती पूजा पवार मॅडम, श्रीमती शिवानी पोतनीस मॅडम आणि विलेपार्ले सेंटरचे प्रमुख श्री अरुण नावगे सर यांचे सतत मार्गदर्शन आणि पाठिंब्याबद्दल मनापासून आभार मानतो.

भाषांतर: श्री. मृगेंदू जोशी

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts