आजची यशोगाथा : नंदिनी मंत्री

0

आजची यशोगाथा : नंदिनी मंत्री

परिचय पत्र

नाव: नंदिनी मंत्री
वय: ६३ वर्षे
उंची: १६२ सेमी
वास्तव्य: मुंबई
व्यवसाय: गृहिणी
समूह: मुंबई PDND
मोबाईल: 8082455230

मी प्रथम 2015 साली एका T.V. Show मध्ये डॉ दीक्षित सरांची मुलाखत पाहिली होती. डॉ दीक्षित जीवनशैलीचा उपयोग करून मी माझे वजन उतरवले होते. तेव्हां सरांनी दोन वेळा जेवा, जेवण 55 मिनिटांत संपवा व साडे चार कि.मी. 45 मिनिटांत रोज चाला एवढेच सांगितले होते. माझे वजन कमी झाले होते पण नियमितता नव्हती त्यामुळे परत वजन वाढले. ह्या वर्षी मार्च 2025 मध्ये माझा रक्तदाब वाढला म्हणून आमच्या फॅमिली डॉक्टरने मला गोळी चालू केली; तेव्हां मी त्यांना विचारले,ही गोळी कधी बंद होईल तेव्हां ते म्हणाले, वजन कमी झाले तर गोळी बंद होईल म्हणून मी वजन कमी करण्यासाठी डॉ दीक्षित जीवनशैलीचा उपयोग करण्याचे ठरवले.”YouTube ” वर सरांची व्याख्याने पाहताना असे कळले की, जेवण क्रमवार पद्धतीने 55 मिनिटांत संपवायचे आहे. ड्राय फ्रुटस-सॅलड-मोड आलेले कडधान्य-पोळी भाजी किंवा आमटी भात. शक्यतो पिष्टमय पदार्थ कमी खायचे. मे 2025 मध्ये YouTube वर मला 90 दिवसाचे वेट लॉस आव्हान अभियांनाबद्दल कळले आणि ठरवले की आपण पण या अभियांनाचा भाग होऊन वजन कमी करून BP ची गोळी बंद करायची. या अभियानात सांगितल्याप्रमाणे एचबीएवनसी व उपाशीपोटी इन्सुलिन ची टेस्ट केली.रिपोर्ट बघितल्यावर कळले की मी पूर्व मधुमेही आहे. मग ठरवले की आपण या अभियांनात सांगितलेल्या गोष्टी काळजीपूर्वक पाळायच्या. हे 90 दिवस हा माझ्या आयुष्यातील शिस्तबद्ध, सकारात्मक, आनंदी व आशावादी कालखंड होता. दिवसातून फक्त 2 वेळा खाणे, प्रत्येकाने पोस्ट केलेले जेवणाच्या थाळीचे फोटो, चालण्याचा स्क्रिनशॉट पाठवणे, योगा, दैनंदिन व्यायाम (डॉ. अष्टेकर मॅडम), रविवार व्याख्याने, समूहातील क्रियाकलाप(activity)त्याचे फोटो पाठवणे, रोजचा गुगल फार्मभरुन पाठवणे यावर अँडमिनचे कटाक्षाने लक्ष व मार्गदर्शन यामुळेच अंगी नियमितता, जागरुकता व शिस्त आली. छान चविष्ट नवीन रेसिपीज करून पाहणे हे प्रेरणादायी होते त्यामुळेच शरीरांतर्गत चांगले बदल दिसून आले. हा जीवन बदलून टाकणारा अभियान चालू केल्याबद्दल डॉ दीक्षित सरांचे मनापासून आभार मानते तसेच आमच्या ग्रुपच्या ॲडमिन अनघा काळे, लीना मॅडम, मेधा मॅडम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार मानते. डॉ दीक्षित जीवनशैली पाळताना माझे पती श्री. नितीन प्रभाकर मंत्री यांनी मला दिलेली मोलाची साथ, वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन, माझ्या जेवणाचे,व्यायामाचे,चालण्याचे स्क्रीन शॉट तसेच रोजचा गुगल फार्मभरुन पाठवणे आठवणीने न कंटाळता केले त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts