आजची यशोगाथा : दिपाली टेकाडे
परिचय पत्र
नाव : दिपाली टेकाडे
वय: ३९ वर्षे
उंची: १७० सेंमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: पिंपरी चिंचवड
समूह: पिंपरी चिंचवड
मोबाईल: 9765104610
मला वाढलेले वजन यामुळे दैनंदिन जीवनात खूप त्रास होत होता. थकवा, अस्वस्थता आणि आरोग्याबाबतची काळजी नेहमी मनात असायची.
मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांचे चॅलेंज बद्दल माहिती फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मिळाली. सुरुवातीला कुटुंबीयांना खात्री नव्हती, विशेषतः सणासुदीच्या दिवसात हे पाळणे अवघड जाईल असे त्यांना वाटले. पण मी ठाम निर्धार करून हे चॅलेंज पूण करायचे ठरवले.
मी पूर्ण शिस्त पाळली – जेवणाचे फोटो शेअर केले, व्यायामाचे अपडेट दिले आणि प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी आत्मसात केल्या.
पहिल्या महिन्यात मला उल्लेखनीय यश मिळाले. एचबीएवनसी ७.१ वरून ६.६% वर आला, उपाशीपोटी इंसुलिन ६२ वरून ९.९ यूनिट पर्यंत कमी झाला. वजन ४.५ किलोने घटले आणि कंबर १०८ सें.मी. पर्यंत कमी झाली. या बदलामुळे मला मोठा आत्मविश्वास मिळाला.
दुसऱ्या महिन्यात प्रगती अजून स्पष्ट दिसली. एचबीएवनसी ६.६ वरून ५.९% पर्यंत आला, जरी उपाशीपोटी इंसुलिन ९.९ वरून १४ यूनिट वर गेला तरीही कंबर १२० वरून जवळजवळ १०२ सें.मी. झाली. वजन मात्र जवळपास स्थिर राहिले. तरीदेखील जीवनशैलीत झालेला बदल सकारात्मक होता.
तिसऱ्या महिन्यात तब्येतीमुळे काही दिवस आहार आणि व्यायाम पाळता आला नाही. त्यामुळे एचबीएवनसी पुन्हा ५.९ वरून ६.२% वर गेला आणि उपाशीपोटी इंसुलिन १४ वरून १८ यूनिट पर्यंत वाढला. वजन मात्र स्थिर राहिले, पण कंबरेचा घेर अजून कमी होऊन ९८ सें.मी. वर आला. हा बदल माझ्यासाठी प्रेरणादायी होता.
९० दिवसांच्या या प्रवासात आरोग्याबाबतची सर्वात मोठी जाणीव म्हणजे – शिस्त अंगीकारल्या शिवाय बदल शक्य नाही. खाण्याच्या लालसेवर नियंत्रण ठेवणे, मनोवृत्ती सकारात्मक ठेवणे आणि सातत्याने प्रयत्न करणे हीच खरी गुरुकिल्ली आहे.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि साथ दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर आणि माझ्या ग्रुपच्या अॅडमिन अंजली पाठक मॅडम आणि कविता शिंदे मॅडम यांचे मनःपूर्वक आभार मानते, ज्यांनी आम्हाला सतत मार्गदर्शन केले. या चॅलेंजमुळे मला जीवनशैली बदलण्याची नवी दिशा मिळाली आणि मी अधिक निरोगी भविष्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जात आहे.


