आजची यशोगाथा : दत्तात्रय शिवाजी देसाई
परिचय पत्र
नाव : दत्तात्रय शिवाजी देसाई
वय: ४२ वर्षे
उंची: १६७ सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: कुरूंदवाड
समूह: KOL-SAN-SAT-GR
मोबाईल: ९०११९४३७५९
माझे वजन मे २०२५ मध्ये ८८ किलो झाले होते आणि पोटाचा घेर १०७ सेंटीमीटर होता. मला असे जाणवत होते की माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर जास्त वजन असल्यामुळे भार पडून गुडघा दुखत होता. मला डॉ. दीक्षित जीवनशैली विषयी माहिती दिग्विजय बंडगर सरांनी दिली. त्यांनी सांगितले की डॉ. दीक्षित जीवनशैलीचे योग्यप्रमाणे पालन केले, व्यायाम नियमितपणे केला तर वजन कमी होऊ शकते.
त्यानंतर एक जून २०२५ पासून मी वजन कमी करण्याच्या ९० दिवसाच्या चॅलेंज मध्ये भाग घेतला, या चॅलेंज मध्ये डॉ. दीक्षित जीवनशैलीचे मी तंतोतंत पालन केले. एका महिन्यात माझे वजन अंदाजे ६ किलो ने कमी झाले आणि पोटाचा घेर ५ सेंटीमीटरने कमी झाला. आता ९० दिवसाचे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर माझे वजन ८८ चे ७६ किलो इतके झाले आणि पोटाचा घेर १०७ सेंटीमीटर वरुन ९६ सेंटीमीटर झाला आहे. एचबीएवनसी % ५.६ चा ५.३ आणि उपाशीपोटी इंसुलिन १०.९ वरुन ५.२ यूनिट झाले आहे. मी कोणत्याही औषधा शिवाय पूर्व मधुमेही चा मधुमेह मुक्त झालो आहे. वजन ही १२ किलो कमी झाल्यामुळे खूपच आनंदी आहे. एकदम हलके हलके वाटत आहे. उत्साह वाढला आहे.
आधी मी पाचशे मीटर पण धावू शकत नव्हतो. पण डॉ. दीक्षित जीवनशैली सुरू केल्यापासून नियमित व्यायाम, रनिंग आणि वॉकिंग केल्यामुळे आता मी सध्या ४२ किलोमीटर पर्यंत धावू शकतो.
मला डॉ. दीक्षित सर, दिग्विजय बंडगर सर, चिंतामणी बोडस सर आणि अभिजीत भस्मे सर यांचे खूप छान मार्गदर्शन मिळाले. माझ्या जेवणात प्रथिने, फायबर आणि कर्बोदकांचे प्रमाण किती असावे, जेवणातील पदार्थ कोणत्या क्रमाने खावे हे समजले. आता माझे वजन कंट्रोलमध्ये राहील. मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो.
मी स्वतः सुद्धा या डॉ. दीक्षित जीवनशैलीचा प्रचार व प्रसार करत आहे.


