आजची यशोगाथा : जयराज भगवान पाटील (२२ नोव्हेंबर)
परिचय पत्र
नाव: जयराज भगवान पाटील
वय: ५४ वर्षे
उंची: १८० से.मी.
वास्तव्य: नाशिक
व्यवसाय: नोकरी. (शासकीय आयटीआय दिंडोरी)
समूह: ७वे वेटलाॅस चॅलेंज, नासिक
मोबाईल: ९४२३२८९६३६
मला उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता या आरोग्याच्या समस्या आहेत. यांमुळे दैनंदिन जीवनात मला खूप अडचणी येत होत्या. वजन कमी करण्याचे अनेक अर्धवट प्रयत्न मी आतापर्यंत केले होते. अशातच
मला डॉ. दीक्षित लाइफस्टाईल आणि त्यांच्या ९० दिवसांच्या वेटलाॅस चॅलेंज बद्दल माझे मित्र श्री. सुनील वडोदकर सर यांनी माहिती दिली.
हे चॅलेंज १ जून २०२५ पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ते स्वीकारण्याचा ठाम निर्णय घेतला. माझे कुटुंबीय आणि मित्रांना मी डाॅ.दीक्षित जीवनशैलीचे पालन करेन याबद्दल खात्री नव्हती. विशेषतः माझे आवडते फळ आंब्याचा पूर्ण सीझन असताना!
पण मी मात्र मनापासून हे चॅलेंज स्वीकारण्याचे ठरवले.
मी पूर्ण नियम आणि शिस्त पाळली. दररोज जेवणाचे फोटो शेअर केले. दररोज सकाळी ४५ मिनिटात ४.५ ते ५ किलोमीटर चालत होतो. नियमित व्यायाम केला. डाॅ.दीक्षित जीवनशैली मध्ये सांगितलेल्या सवयी अंगीकारल्या.
पहिल्या महिन्यात ६ किलो वजन कमी झाले, साखरेचे प्रमाण कमी झाले. दुसर्या (जुलै 2025) महिन्यामध्ये अजून प्रगती झाली.
९० दिवसांनंतरचे अंतिम निकाल:
एचबीए वन सी: ६.८→ ६.१
वजन: ९८.१ → ८७.३
कंबर: ११७→ ११०
उर्जा वाढली. प्रसन्न वाटते. आत्मविश्वास वाढला.
माझे वजन २००५ पासून खूप प्रयत्न करुनही कधीही कमी झाले नव्हते. परंतू डाॅ.दीक्षित जीवनशैली अंगीकारल्यामुळे ते सहज साध्य झाले. खाण्यावर नियंत्रण, शिस्त आणि सकारात्मकता इ.फायदे झाले. या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर, DRCC नाशिकचे श्री. नंदन सर, वंदना जोशी मॅडम, डॉक्टर रत्ना अष्टेकर मॅडम, श्री विजय शेळके सर यांचा मनापासून आभारी आहे..
मराठी संपादन : डॉ. सौ. सुहासिनी देशपांडे


