आजची यशोगाथा : खुशबू वसाणी
परिचय पत्र
नाव : खुशबू वसाणी
वय: ३४ वर्षे
उंची: १६३ सेंमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: मुंबई
समूह: मुंबई DYDN
मोबाईल: ८९५६९२२०८३
ईमेल: khushimashru1991@gmail.com
मला माईग्रेन चा खूप त्रास होता. दर ८-१५ दिवसात १स्ट्रोक यायचाच. माझ्या सासूबाई २-३ वर्षांपासून डॉ दीक्षित जीवनशैली चे पालन करीत आहेत. वेटलॉस आणि माईग्रेन साठी त्यांनी १ जून २०२५ पासून सुरू होणाऱ्या डॉ. दीक्षित वेट लॉस व डाइबेटिस रिवर्सल चॅलेंज मध्ये भाग घेण्याचा सल्ला दिला. त्यासाठी रक्त तपासणी केली असता मी मधुमेही असल्याचे समजले. माझ्या घरची हिस्ट्री मधुमेही असल्यामुळे या ९० दिवसांच्या वेटलॉस चॅलेंज मध्ये मात्र मी स्वतःला पुर्णपणे शिस्तबद्ध करण्याचा निर्धार केला.
पूर्ण ९० दिवस मी काटेकोरपणे दोन वेळा जेवण्याचा नियम पाळला. इतकंच नाही तर या काळात ९० दिवसांत मी ५-६ वेळा मुंबईबाहेर गेली, तरीदेखील दोन वेळच्या नियमाचं पालन केलं. बाहेर असतांना जेवणाचा क्रम आणि वेळ मागे–पुढे झाला, पण नियम मोडला नाही.
या शिस्तीचा परिणाम माझ्या वजनावरही स्पष्ट दिसून आला. चॅलेंज सुरू होण्याआधी माझं वजन ७५ किलो होतं आणि ९० दिवस संपता–संपता ते ७२ किलोवर आलं. ५ सेंमी ने इंचलॉसही झाल्यामुळे एकदम हलके हलके वाटत आहे. एचबीएवनसी % ६.७ चे ५.८ पर्यन्त कमी झाले. मी मधुमेही ची पूर्व मधुमेही मध्ये आले.
90 दिवसानंतरचे अंतिम निकाल:
एचबीएवनसी %: ६.७ → ५.८
वजन: ७५ किलो→ ७२ किलो
पोटाचा घेर: ९८ → ९३ सेंमी
जेव्हापासून मी हे डाएट सुरू केले माईग्रेन च्या त्रासामध्ये मोठा फरक जाणवला. ’१ जून २५ ला मला माईग्रेन चा शेवटचा स्ट्रोक आलेला’ म्हणजे ही माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे.
माझ्यासाठी हा प्रवास फक्त ९० दिवसांचा प्रयोग नव्हता, तर माझ्या नव्या आयुष्याचा खरा प्रारंभ आहे. आता ही जीवनशैली माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे आणि पुढे आयुष्यभर पाळण्याचा माझा दृढ निर्धार आहे.
मी डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांचे विशेष आभार मानते, ज्यांनी ही उपयुक्त जीवनशैली संपूर्ण भारताला दिली. तसेच माझ्या मुंबई DYDN ग्रुपच्या ऍडमिन पूजा मॅडम आणि शिवानी मॅडम यांचे मनःपूर्वक आभार, ज्यांनी या ९० दिवसांच्या प्रवासात वेळोवेळी मार्गदर्शन, प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले.
हा प्रवास माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील आणि मला आत्मविश्वास, आरोग्य व नवी ऊर्जा देऊन गेला आहे. माझी मनापासून अशी इच्छा आहे की, माझा हा अनुभव इतरांसाठीही प्रेरणादायी ठरावा आणि अजून अनेकांनी या जीवनशैली चा स्वीकार करून स्वतःचं जीवन बदलून टाकावं.


