आजची यशोगाथा : कविता कृष्णा   ( ४ जानेवारी २०२६ )

0

आजची यशोगाथा : कविता कृष्णा   ( ४ जानेवारी २०२६ )

परिचय पत्र

नांव: कविता कृष्णा
वय:  ५७
उंची: १५६
व्यवसाय: शाळेत समन्वयक
वास्तव्य: बंगलोर
मोबाईल नं: ८९७०५२९२८३
समूह क्र.: RMI DYDN समूह ७

मी ऑक्टोबर २०२४ मध्ये डॉ. दीक्षित जीवनशैली सुरू  केली. कारण मी एक मधुमेही आणि स्थूल व्यक्ति असून गेली अनेक वर्ष या समस्येसाठी उपाय शोधत होते.

यापूर्वी अनेक व्हिडिओ पाहून विविध प्रकारच्या आहार योजनांचे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. उदा. VRK, सात्विक जीवनशैली, शाकाहारी डाएट, केवळ फळांचा आहार, डिप डाएट आणि बरेच काही..
तसेच मी शुगर फिट आणि ट्विन हेल्थ सारख्या कार्यक्रमांचे वार्षिक सदस्यत्वही घेतले होते.
परंतू त्यापैकी कोणत्याही आहारयोजनेचे नियमितपणे पालन करू शकले नाही आणि निराश झाले.

या निराशेत, मी टेलिग्राम चॅटमध्ये एक संदेश लिहिला होता, ज्यामध्ये मधुमेह बरा करण्याचा सोपा मार्ग विचारला होता. आणि आश्चर्य म्हणजे मुंबईतील सत्यजित नावाच्या एका अनोळखी व्यक्तीने उत्तर दिले आणि मला डॉ दीक्षित जीवनशैली बद्दल सांगितले.
मी डॉ दीक्षित सरांचे डॉ दीक्षित जीवनशैली संदर्भातील मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली आणि भालचंद्र बैलूर सरांचे संपर्क तपशील मिळवले.

ऑक्टोबर 2024 मध्ये मी श्री.भालचंद्र बैलूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ दीक्षित जीवनशैली  सुरू केली. त्यानंतर मला हळू हळू परिणाम दिसू लागले. माझी एचबी ए वन सी पातळी कमी झाली, वजन, उपाशीपोटी इन्सुलिन कमी झाले.
मे २०२५ मध्ये मी त्यांच्या गटात सामील झाले आणि दररोज यशोगाथा वाचल्याने मला ९० दिवसांचे आव्हान स्विकारण्यास अधिक प्रेरणा मिळाली.

सुदैवाने लवकरच हे आव्हान जूनमध्ये सुरू झाले आणि मी आनंदाने त्यात सामील झाले.

पद्मा मॅडमच्या मार्गदर्शनाखाली, मला माझ्या आरोग्यात उल्लेखनीय बदल दिसले. त्यांनी माझ्या सर्व शंका दूर केल्या आणि गरज पडेल तेव्हा मला मार्गदर्शन केले.

चार महिन्यात माझे वजन,  एचबी ए वन सी, उपाशी पोटी इन्सुलिन कमी झाले.
माझ्या पायात वेदना झाल्यामुळे माझा चालण्याचा वेग कमी झाला होता. तरीही शक्य तेवढे चालणे आणि आहारामध्ये बदल यामध्ये सातत्य येऊ लागले.
काही वेळा दुपारच्या जेवणासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जेवल्यामुळे मला अंकुरलेले धान्य आणि सॅलड खाणे शक्य झाले नाही.
असे असूनही, मला डॉ दीक्षित जीवनशैलीचा  खूप चांगला फायदा झाला. भविष्यात मी या योजनेचे काटेकोरपणे पालन करेन आणि औषधमुक्त होईन याची मला खात्री आहे.

श्री.भालचंद्र आणि सुश्री पद्मा माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत. मी देखिल असे काम करु इच्छितो. मी डॉ. दीक्षित जीवनशैली चळवळीत स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे.

मला वाटते की ही जीवनशैली पाळणे सोपे आहे आणि सर्वांना आवश्यक आहे.
धन्यवाद!

अनुवाद: डॉ. सुहासिनी सुनिल देशपांडे

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts