आजची यशोगाथा : करतार सिंह ( 16 मार्च २०२६ )
परिचय पत्र
नाव: करतार सिंह
वय: ४१ वर्षे
उंची: १७० सेमी
वास्तव्य: दिल्ली
व्यवसाय: अकाउंटंट
समूह: DM ०८ REV
मोबाईल: ९९९९२ ३९६६५
१-११-२०२५ रोजी मी माझी एचबीएवनसी तपासणी करून घेतली. ती ७% होती आणि PP १४७ होते. मी माझे रिपोर्ट डॉक्टरांना दाखवले. त्यांनी मला मेटफॉर्मिन घेण्याचा सल्ला दिला. औषध घेण्याऐवजी मी दोन वेळा जेवणाच्या पद्धतीसह डॉ. दीक्षित जीवनशैली सुरू केली.
माझे पहिले जेवण सकाळी ९.०० वाजता असते (५ बदाम + २ अक्रोड, १ काकडी, मोड आलेली कडधान्ये / २ अंडी, भाजी + पोळी / भात, दूध). दुसरे जेवण दुपारी २ वाजता असते (५ बदाम + २ अक्रोड, १ काकडी, मोड आलेली कडधान्ये / २ अंडी, भाजी + पोळी / भात, १५० ग्रॅम दही). ही पद्धत माझे समन्वयक प्रशांत गाडगीळ यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू केली.
डॉ. दीक्षित जीवनशैली सुरू केल्यानंतर ४० दिवसांत माझे वजन ५ किलोने कमी झाले आणि आता BMI नुसार माझे आदर्श वजन ७० किलो झाले आहे. माझ्या कंबरेचा घेरही १० सेमीने कमी झाला आहे. मला आता हलके आणि अधिक ऊर्जावान वाटत आहे.
सध्या माझे एचबीएवनसी ५.८% आहे आणि उपाशीपोटी इन्सुलिन ६.८ आहे. मी स्वतःला वचन दिले आहे की मी नेहमी डॉ. दीक्षित जीवनशैलीचे पालन करेन आणि लवकरच मी मधुमेहमुक्त होईन.
मी डॉ. दीक्षित जीवनशैलीच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो आणि विशेषतः श्री. प्रशांत गाडगीळ यांचे त्यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनासाठी मनःपूर्वक आभार मानतो.
माझे निकाल (०१-११-२०२५ ते ०७-०३-२०२६)
एचबीएवनसी: ७.० → ५.८%
फास्टिंग इन्सुलिन: १६ → ६.८
वजन: ८०.५ किलो → ७० किलो
कंबरेचा घेर: ९९ सेमी → ९० सेमी
(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)


