आजची यशोगाथा : उत्सव जोशी ( १८ मार्च २०२६ )

0

आजची यशोगाथा : उत्सव जोशी ( १८ मार्च २०२६ )

परिचय पत्र

नाव: उत्सव जोशी
वय: ३८ वर्षे
उंची: १८१ सेंमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: अभियंता
समूह: PUNE DYDN
मोबाईल: ९५४५२४६१५८

नोकरी बदलताना केलेल्या चाचणीत एचबीएवनसी ८.४% आणि रक्तातील साखरेचे प्रमाण २६० इतके पाहून मला प्रचंड धक्का बसला. आरोग्याची समस्या तर होतीच पण नवीन नोकरी मध्ये रुजू तरी करून घेतील का? अशी शक्यता निर्माण झाली होती. डॉक्टरांनी कायम स्वरुपी औषधे सुरू करायचा सल्ला दिला होता. काहीही झाले तरी औषधाच्या आहारी जायचे नाही असा चंग बांधलेल्या माझ्या पत्नीने मला डॉ दीक्षित जीवनशैली पाळावी म्हणून मला प्रोत्साहित केले. ऑगस्ट २०२१ पासून मी ह्या जीवन शैली चे पालन करतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या ९० दिवसाच्या अभियानात सुद्धा मी सहभागी झालो होतो. गेल्या ४ वर्षात ही जीवन शैली अंगवळणी पडली असून. आत्ता केलेल्या चाचणी मध्ये एचबीएवनसी ६.३% असून रक्तातील साखर ११३ इतकी आहे. दुपारी आणिरात्री नेहमी जेवायच्या वेळेस जेवण घेतो. जेवणात कडधान्ये , सॅलड ह्याच्यावर भर देतो. प्रसंगानुरूप भेळ , चिवडा इत्यादी आवडीचे पदार्थ ५५ मिनिटात खातो. व्यायाम नियमित पणे होत नसल्यामुळे जीवन शैली चा पूर्णफायदा मिळत नाही, पण प्रयत्न सुरू आहेत.

मी मला मिळालेल्या यशाचे श्रेय डॉ दीक्षित आणि त्यांचे सहकारी व माझ्या कुटुंबियांना आहे. मी या सर्वांचे आभार मानतो.

(मराठी पुनर्लेखन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts