आजची यशोगाथा : इंदूबेन ओझा ( ४ एप्रिल २०२६ )

0

आजची यशोगाथा : इंदूबेन ओझा ( ४ एप्रिल २०२६ )

परिचय पत्र

नाव: इंदूबेन ओझा
वय: ५८ वर्षे
उंची: १५५ सेमी
वास्तव्य: गांधीनगर (गुजरात)
व्यवसाय: गृहिणी
समूह: RMI PDND
मोबाईल: ९६८७७४४००४

मला उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, वजन वाढणे आणि सांधेदुखी यांचा त्रास होत होता, ज्याचा माझ्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत होता. मला माझ्या भावामार्फत डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांचे चॅलेंज याबद्दल माहिती मिळाली. १ जून २०२५ पासून चॅलेंज सुरू होणार असल्याचे समजताच मी त्यात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. काही अडचणी येतील हे माहीत असूनही मी पूर्ण प्रयत्न करण्याचा निर्धार केला. माझ्या कुटुंबीयांनीही मला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. माझे पतीही त्यांचा मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी या चॅलेंजमध्ये सहभागी झाले. माझ्या पतींच्या नव्याने निदान झालेल्या मधुमेहामुळेच या प्रवासाची सुरुवात झाली.
मी पूर्णपणे कटिबद्ध राहिले — जेवणाचे फोटो शेअर करणे, व्यायामाचे अपडेट्स देणे आणि कार्यक्रमात शिकवलेल्या शिस्तीचे पालन करणे. पहिल्या महिन्यात माझे वजन ७५ कि.ग्रॅ. वरून ६९.३ कि.ग्रॅ. झाले आणि कंबरेचा घेर ९५ सेमी वरून ८९.५ सेमी झाला. दुसऱ्या महिन्यात वजन आणखी कमी होऊन ६८.५ कि.ग्रॅ. झाले आणि कंबरेचा घेर ८८.५ सेमी झाला. आता तिसऱ्या महिन्यात माझे वजन ६७.२ कि.ग्रॅ. आणि कंबरेचा घेर ८७ सेमी आहे.

९० दिवसांच्या शेवटी:
एचबीएवनसी: ५.१० → ५.१०
वजन: ७५ कि.ग्रॅ. → ६७.२ कि.ग्रॅ.
कंबर: ९५ सेमी → ८७ सेमी
इतर सुधारणा: उर्जेची पातळी वाढली आणि सांधेदुखी कमी झाली.
माझ्यासाठी सर्वात मोठी जाणीव म्हणजे शिस्त, योग्य मानसिकता आणि आत्मनियंत्रण यांच्या जोरावर मी माझे वजन कमी करू शकले आणि आरोग्य अधिक चांगले करू शकले.
माझ्यात झालेले बदल पाहून मला इतरांना प्रेरित करण्यासाठी माझे अनुभव सांगण्याची संधी मिळाली. दोन प्रसंगी मी माझे अनुभव सांगू शकले आणि ५ जणांना डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांच्या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. डॉ. दीक्षित आणि त्यांची संपूर्ण टीम जे हे महान कार्य समर्पित भावनेने करत आहेत, त्याबद्दल मला मनापासून आदर आहे. या मोहिमेत सक्रियपणे योगदान देऊ शकले नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, परंतु अप्रत्यक्षरीत्या मदत करण्यास मी सदैव तयार आहे.
मी डॉ. दीक्षित सर, माझ्या RMI PDND समूहातील अॅडमिन कविता मेहेंदळे मॅडम, संजीव सिंग सर, रामकृष्ण अहिरे सर आणि संपूर्ण टीमचे त्यांच्या सततच्या मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानते.

(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts