आजची यशोगाथा : आशा कुलकर्णी (२६ नोव्हेंबर)
परिचय पत्र
नाव: आशा कुलकर्णी
शहर: नवी मुंबई
व्यवसाय: निवृत्त
वय: ७३
गट: नाव ठाणे-मुंबई
संपर्क क्रमांक: ९८१९७५७९५३
मला मधुमेह असल्याने, माझ्या डॉक्टरांनी दिवसातून दोनदा गोळ्या घेण्याचा सल्ला दिला. २०१९ मध्ये जेव्हा मी डॉ. दीक्षित जीवनशैली सुरू केली तेव्हा माझे वजन ७७ किलो होते. माझ्या मार्गदर्शक/सल्लागाराकडून मला ही जीवनशैली पाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन मिळाले होते. दिवसातून दोनदा माझ्या सुचवलेल्या आहारासोबतच मी दररोज ५-६ किमी चालत असे आणि दररोज योगा/कार्डिओ व्यायामही करत असे.
६ ते ८ महिन्यांत माझे वजन कमी होऊ लागले आणि माझ्या औषधांचा डोसही कमी झाला. पुढील १८ महिन्यांत माझे औषध बंद करण्यात आले आणि वजन ७० किलोपर्यंत कमी झाले हे सांगताना आनंद होत आहे. साथीच्या काळातही मी घरी चालणे आणि व्यायाम करणे आणि घर सांभाळण्याच्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त राहिले. हळूहळू माझे वजन ६६ किलोपर्यंत कमी झाले.
अतिआत्मविश्वासामुळे माझे वजन वाढू लागले. म्हणून मी सहाव्या वजन कमी करण्याच्या आव्हानात नावनोंदणी केली ज्यामध्ये मी पुन्हा दीक्षित जीवनशैलीकडे वळले. ऑक्टोबर २०२४ मध्ये मला झटका आला आणि माझ्या पाठीला दुखापत झाली हे दुर्दैवी होते. यामुळे माझी नियमित कसरत तसेच जीवनशैली थांबली आहे.
जेव्हा मला ७ व्या वजन कमी करण्याच्या आव्हानाबद्दल कळले तेव्हा मी लगेच स्वतःची नोंदणी केली. मधुमेहमुक्त होण्याचे माझे ध्येय साध्य झाले आहे हे सांगताना आनंद होत आहे.
ग्रुपच्या आमच्या सर्व प्रशासकांचा, डॉ. दीक्षित सर, मयुरेश सर आणि विशेषतः प्राप्ती गांधी यांचा मी खूप आभारी आहे, जेव्हा जेव्हा त्यांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी प्रेरणा दिली आणि त्यांचे मौल्यवान मार्गदर्शन केले. तसेच संपूर्ण टीमचे खूप खूप आभार, ज्यांनी आम्हाला मदत करण्यासाठी अथक परिश्रम केले.
मी भविष्यातही दोन वेळच्या जेवणाची जीवनशैली सुरू ठेवेन आणि माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना निरोगी जीवन जगण्यास प्रोत्साहित करेन.
(मराठी भाषांतर : अरुण नावगे )


