आजची यशोगाथा : अपर्णा गोऱ्हे (२२ जानेवारी २०२६)

0

आजची यशोगाथा : अपर्णा गोऱ्हे (२२ जानेवारी २०२६)

परिचय पत्र

नाव: अपर्णा गोर्हे
वय: ४९ वर्षे
उंची: १६५ सेमी.
वास्तव्य: नासिक
व्यवसाय: नोकरी
समूह: नासिक ग्रूप
मोबाईल: 8669190004

मी लहानपणापसूनच जरा जास्त हेल्दी होते पण वयाच्या चाळीशीनंतर वजन कमी असावे असे वाटत होते, कारण वजन वाढलेले होते, मी ट्रॅक वर फिरायला जात होते परंतु काही फरक पडला नाही. काही त्रास नव्हता पण ब्लड टेस्ट केल्यावर एचबीएवनसी ७% आले आणि फॅमिली डॉक्टर ने गोळ्या घ्या असा सल्ला दिला, परंतु केवळ डॉ दीक्षितांच्या सल्ल्यानुसार मी गोळ्या सुरू केल्या नाहीत, आणि मला इतका चांगला अनुभव मिळाला. डॉक्टर दीक्षित सर आणि टीम चे मन:पूर्वक धन्यवाद. मला डॉ. दीक्षित लाइफस्टाईल आणि 90 दिवसांचे चॅलेंज बद्दल माहिती मिळाली. हे चॅलेंज 1/6/25 पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. माझ्या कुटुंबीय आणि मित्रांना खात्री नव्हती, विशेषतः श्रावण महिना म्हणजे गोड खाण्याचा महिना, कारण उपवास आणि प्रसादाला गोड यासारख्या सणांमुळे, पण मी पूर्णमनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले.
मी पूर्णशिस्त पाळली, जेवणाचे फोटो शेअर केले, व्यायाम/क्रियाकलाप अपडेट केले, प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या. पहिल्या महिन्यात मला वजन कमी होणे, साखरेचे प्रमाण कमी होणे असा बदल दिसला. पुढील महिन्यांमध्ये अजून प्रगती झाली.

90 दिवसांनंतरचे अंतिम निकाल:
एचबीएवनसी: सुरुवातीचे 7.00→ शेवटचे 6.6%
वजन: सुरुवातीचे 72.60 किलो → शेवटचे 70.50 किलो
कंबर: सुरुवातीची ९५ सेमी→ शेवटची ८४ सेमी

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे हे चलेंज फक्त 3 महिन्यासाठी नसून ही जीवनशैली आहे ती कायमस्वरूपी अंगिकारली तरच त्याचा फायदा होऊ शकतो. या अभियानात सातत्य शिस्त आणिसंयम या तीन गोष्टी एकत्र केल्यावरच आपल्याला यश मिळू शकते. आधी मी चालायला जात होते पण किती वेळात किती चालणे गरजेचे आहे, किवा किती वेळात कोणत्या क्रमाने काय खाणे गरजेचे आहे याचे महत्वपूर्ण मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित, श्री विजय शेळके आणि पाटील सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले तसेच प्रोत्साहन दिले, त्यांची सगळ्यांची मी आभारी आहे.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts