आजची महत्वाची सूचना : आपण HbA1C आणि फास्टिंग इन्सुलिन या तपासण्या का कराव्यात ? ( ८ डिसेंबर )
आजची महत्वाची सूचना
आपण HbA1C आणि फास्टिंग इन्सुलिन या तपासण्या का कराव्यात ?
HbA1C आपल्याला तीन महिन्यांचे सरासरी रक्त शर्करेची पातळी (ब्लड ग्लुकोज लेवल )निर्देशित करते .
ते सामान्य स्थितीमध्ये ५.६ पर्यंत असावे . ५.७ ते ६.४ हे डायबेटिसची पूर्व स्थिती सुचवते. ६.५ आणि त्याहून अधिक याला मधुमेही म्हणतात.
फास्टिंग इन्सुलिन (उपाशीपोटीचे इन्सुलिन) हे इन्सुलिन रेसिस्टन्स (इन्सुलिनची अकार्यक्षमता ) आणि डायबेटिसच्या संभाव्य धोक्याची कल्पना देते .
२ ते २५ ही त्याची सामान्य पातळी . पण उपाशीपोटी असताना ते शक्य तितक्या शून्याच्या जवळ अथवा कमीत कमी असावे .
आपल्या डाएट प्लानचे चार फायदे आहेत .
१. तुमचे वजन/मेद कमी होते
२ . पोटाचा घेर कमी होतो .
३. तुमचे HbA1C कमी होते. म्हणजे डायबेटिसच्या पूर्व स्थितीतून तुम्ही डायबेटीस नसण्याच्या सामान्य स्थितीत येता .
४ . तुमचे फास्टिंग इंसूलिन कमी होते म्हणजे तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे कार्य सुधारते . अर्थात तुम्ही डायबेटीस होण्याच्या शक्यतेला पुढे ढकलता .
म्हणूनच तुमच्या प्रगतीचा आलेख समजण्या करीता आम्ही तुम्हाला दर महिन्याला वजन आणि पोटाचा घेर मोजायला सांगतो . आणि दर तीन महिन्यांनी HbA1C आणि फास्टिंग इन्सुलिन .
या डाएट प्लानचा आपल्याला होणाऱ्या फायद्याची नोंद ठेवण्याकरिता कृपया या तपासण्या कराव्यात.
(मराठी अनुवाद : डॉ . स्वाती उनकुले)
