आजचा प्रश्न: साखर खाणे चांगले की वाईट ?

0

आजचा प्रश्न: साखर खाणे चांगले की वाईट ?

उत्तर: साखरेचे खाणार त्याला देव देणार, ही म्हण आरोग्याच्या दृष्टीने चुकीची आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या १७ एप्रिल २०१३ च्या अंकात अमेरिकी अंत:स्रावी ग्रंथीशास्त्र तज्ज्ञ रॉबर्ट लस्टीग यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्यामते इन्सुलिन आणि साखर ही आपल्या लठ्ठपणाची मुख्य कारणे आहेत. साखरेमुळे इन्सुलिनची निर्मिती जास्त प्रमाणात होते. याची परिणती शरीरात चरबी साठवण्यात होते. साखरेच्या हानिकारक परिणामांसाठी त्यातील फ्रुक्टोज ही शर्करा जबाबदार असते. लस्टीगच्या म्हणण्यानुसार साखरेचे व्यसनही लागते . गोड खाण्याची सवय लहानपणीच लागते व नंतर काही व्यक्ती कायमसाठी गोडघाशा बनतात हे आपण बघतोच. _अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांना कायद्याने साखरबंदी करावी_ असेही त्यांचे मत आहे. एकूण महत्वाचे म्हणजे साखरेतून वायफळ ऊर्जा मिळते. इन्सुलिनची निर्मिती वाढते व शरीरात चरबीची साठवण होते. म्हणून जास्त साखर खाणे नक्कीच हितकारक नाही

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts